काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं
स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।।
नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे
सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।।
स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती
जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।।
स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दुजांना जाणूनी
दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।।
ओंगळपणाचे चित्रण करती जे लेखक- कवि
आगळेपणाची भूमिका मनांत त्याच्या असावी ।।५।।
बाध न येतां बंधनाला भव्य असे करुं शकतात
चाकोरी मध्येंच राहूनी आकाशाला भिडूं शकतात ।।६।।।
निर्माण करुन गीतेला हजारों वर्ष ती झाली
तोच विषय पुन्हां घेउनी ज्ञानोबांनी बाजी मारली ।।७।।
सोडा तुम्हीं वेडा विचार स्वचछंदी त्या जगण्याचा
गढूळ होता वातावरण गुदमरेल जीव तुमचा ।।८।।
जेव्हां कुणी स्वातंत्र्य मागे त्याच्याही मर्यादा असती
दुजे त्याच्या पाठीमागचे एक पाऊल पुढे टाकती ।।९।।
दुसऱ्याचे हेच पाऊल पहिल्यास ठरे घातक
दुष्टचक्र स्वच्छंदाचे पोखरुन टाकील कित्येक ।।१०।।
तयार करित आहात बेतालपणाचा भस्मासूर
तुम्हांलाही नष्ट करील हात ठेउनी शिरावर ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply