भानुप्रिया हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील असे एक नाव आहे, ज्याला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९६७ रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंदरी(रंगमपेटा गाव)येथे झाला. भानुप्रियाने तामिळ,तेलगु,कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे. भानुप्रियाचे खरे नाव मंगा भामा आहे. तिच्या घरी अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. शाळेत असताना दिग्दर्शक भाग्यराजा गुरू एके दिवशी शाळेत आले. त्यांना त्यांचा सिनेमात एका टीन एज मुलीला घ्यायचे होते. त्यांनी भानुप्रियाची निवड केली.
मात्र फोटोशूटवेळी भानुप्रिया खूप छोटी दिसली. त्यामुळे त्यांनी तिला सिनेमातून काढून टाकले. जेव्हा भानुप्रियाला हे समजले,तेव्हा ती पुन्हा शाळेत कधीच गेली नाही. कारण शाळेतील विद्यार्थी आपली थट्टा उडवतील असे तिला वाटले होते. वयाच्या १७ व्या वर्षी भानुप्रियाने अभिनय करिअरला सुरुवात केली.तिचा पहिला सिनेमा १९८३ मध्ये रिलीज झालेला’मेल्ला पेसुन्गल’आहे.हा एक तामिळ सिनेमा होता. ९० च्या दशकात बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेल्या भानुप्रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये दीडशेहून अधिक सिनेमे केले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply