आता फक्त सहन करावे
जे जे दिसेल ते ते पहावे
बोलू नये , कधीच काही
फक्त सदा मौन पाळावे ।।१।।
जग हे सारेच बदललेले
भौतिक आकर्षणी रमावे
मतलबी व्याख्या सुखाची
क्षणिक आनंदाचीच खेळी
फक्त आपण पहात रहावे ।।२।।
स्वार्थीच साऱ्याच भावनां
बाजार , भोगवादीच सारा
प्रीती फक्त केवळ दिखावा
वास्तव कलियुगाचे जाणावे ।।३।।
ऋणानुबंधी , सुख क्षणभरी
मृगजळी तो भास वाळवंटी
उगा फुकांचे हे व्यर्थ धावणे
सांगा जीवाने कसे ओळखावे ।।४।।
– ©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ८७.
२८ – ६ -२०२१.
Leave a Reply