नवीन लेखन...

भिजलेली रास खडीची

भिजलेली रास खडीची, गंजत पडलेले पत्रे
निसरड्या पायरीवरती हुंगत बसलेले कुत्रे

कचरापेट्यांना आली बुरशीची दमट नव्हाळी
कावीळलेल्या भींती आता झाल्या शेवाळी

बिथरला डांबरी रस्ता, बिचकली मातकट धरती
विटकरी गांडुळे आली माना वेडावत वरती

मग पागोळ्यांच्या गोळ्या टपर्‍यांवर तडतड करती
वर चहाळ वाफा आल्या की मेणकापडे चळती

उंबर्‍याजवळ दिसणारी वाळवीच तरणीताठी
अन कुरबुरण्यात उलटली ह्या बिजागरींची साठी

वैचित्र्यातील सौंदर्ये पाऊस घेऊनी आला
पण मनातल्या चिखलाचा शिंतोडा एक उडाला

— ॐकार जोशी 

Avatar
About ॐकार जोशी 8 Articles
ॐकार जोशी हे गमभन यय मराठी सॉफ्टवेअरमुळे सर्वांना परिचित आहेतच. गेली अनेक वर्षे गमभनच्या माध्यमातून आपण ऑनलाईन लिहित आहातच. मात्र ॐकार हे एक संवेदनशील कवीसुद्धा आहेत हे फार कमी जणांना माहित असेल....
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..