बॉलीबुडचे विनोदाचे बादशाह राजेन्द्र नाथ यांचा जन्म ८ जून १९३१ रोजी टिकमगड स्टेट येथे झाला.
राजेन्द्र नाथ यांचे पूर्ण नाव राजेन्द्र नाथ मल्होत्रा. जुन्या काळी प्रसिद्ध नायकांबरोबर विनोद वीरांची जोडी असे, जसे गुरुदत्त यांच्या बरोबर जॉनी वॉकर तसे शम्मी कपूर यांच्या बरोबर राजेन्द्र नाथ. त्यांचे वडील ब्रिटीश पोलीस खात्यात मोठ्या हुद्द्यावर होते त्यांची नियुक्ती मध्यभारतात झाल्याने राजेन्द्रनाथ यांचे शालेय शिक्षण रीवा येथे तर महाविद्यालयीन शिक्षण नर्मदाकाठच्या जबलपूर येथे झाले . त्यांचा मोठा भाऊ म्हणजे प्रख्यात सिने-अभिनेता, प्रेमनाथ ! त्यांची बहिण कृष्णा यांचा विवाह राज कपूर यांच्या बरोबर झाला होता. प्रेमनाथ यांना पृथ्वीराज कपूर यांनी मुंबईला बोलवून घेतले होते. मोठे बंधू अभिनेता होत आहेत हे बघून राजेन्द्र नाथ पण १९४९ ला मुंबई आले. मुंबईला आल्यावर राजेन्द्र नाथ यांना चित्रपटात कामे मिळण्यासाठी खूप वाट पाहवी लागली.
आय.एस. जौहर यांनी राजेन्द्र नाथ यांना ‘हम सब चोर हैं’ या चित्रपटात ब्रेक दिला. नासिर हुसैन यांच्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटामुळे राजेन्द्र नाथ यांचे नाव झाले. देव आनंद व आशा पारेख यांच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटात राजेन्द्र नाथ यांनी पोपटलाल हे व्यक्तिमत्व निभावले होते. या पोपटलाल व्यक्तिमत्वाला खूप लोकप्रियता मिळाली. डोळ्यावर मोठा व जाड चश्मा डोक्यावर टोपी, मोजे व मोठे बूट यात राजेन्द्र नाथ कित्येक चित्रपटात दिसून आले. त्यांचा हा गेटअप खूप लोकप्रिय झाला. राजेन्द्र नाथ यांनी हिंदी बरोबरच पंजाबी और नेपाळी चित्रपटात कामे केली.’शरारत’,’जब प्यार किसी से होता है’,’फिर वही दिल लाया हूँ’,’पूरब और पश्चिम’,‘जानवर’,’ हरे रामा हरे कृष्णा’,’मेरा नाम जोकर’,’प्रेमरोग’ अशा अनेक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. सुनील दत्त यांची मुख्य भूमिका असलेल्या ” मुझे जीने दो ” या चित्रपटात मात्र त्यांनी विनोदी भूमिका न करता चंबळच्या खोऱ्यातल्या डाकूची भूमिका केली होती. टीव्ही सीरियल हम पांच में मध्ये सुद्धा मिस्टर पोपटलाल हे व्यक्तिमत्व केले होते. त्यांनी पोपटलाल या व्यक्तिमत्वाचा फायदा घेऊन ‘द पोपटलाल शो’ नावाचा एक कार्यक्रम बनवला व परदेशात प्रस्तुत केला. राजेन्द्र नाथ यांचे निधन १३ फेब्रुवारी २००८ रोजी झाले.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
https://www.youtube.com/watch?v=RSNV9DbpPcM
Leave a Reply