रणधीर कपूर यांची एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता व करीश्मा व करीना कपूर यांचे वडील व राजकपुर यांचा मुलगा अशी ओळख आहे. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. रणधीर कपूर यांना चित्रपट क्षेत्र हे वारसाने मिळाले आहे. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. तर रणधीर कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दो उस्ताद’ चित्रपटात काम केलेल्या रणधीर कपूर यांनी १९६८ सालच्या ‘झुक गया आसमान’ चित्रपटा दरम्यान सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले होते. १९७१ च्या ‘कल आज और कल’ चित्रपटात अभिनय केलेल्या रणधीर कपूर यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात देखील पाऊल ठेवले. चित्रपटात कपूर कुटुंबातील पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर या तीन पिढ्यांनी अभिनय केला होता. याशिवाय बबीताने देखील महत्वाची भूमिका साकारली होती. सत्तर ऐंशीच्या दशकात त्यानी हिंदी चित्रपट जवानी दिवानी, हाथ कि सफाई, रामपूर का लक्ष्मण, ढोंगी, खलिफा, कच्चा चोर, कल आज और कल, पोंगा पंडित, कस्मे वादे, बिवी ओ बिवी, भंवर, हरजाई, हमराही, चाचा भातीजा,राम भरोसे,आज का महात्मा, लफंगे, खलिफा आखरी डाकू, पुकार असे चांगले व उत्तम चित्रपट दिले. किशोरकुमार व त्याचे चांगले जमत असे. किशोरकुमार यांनी गायलेली गुम है किसीके प्यारमे दिल सुबह शाम’, ‘जा ने जा धुंडता फिर रहा’ व ‘भवरे की गुंजन ए मेरा दिल’ ही गाणी अजून लोकांच्या तोंडावर आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply