बॉलिवूड खलनायक अभिनेते अजीत यांचा जन्म २७ जानेवारी १९२२ रोजी झाला.
त्यांचे खरे नाव हामिद अली खान असे होते. अभिनेते अजीत हे हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेता होते. अजीत यांनी जंजीर सिनेमात सेठ धरम दयाल तेजा हे पात्र साकारले होते. अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. ‘जंजीर’नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात वेगळी ओळख मिळाली. खरं तर त्यांनी सिनेसृष्टीतील त्यांची एन्ट्री ही हीरोच्या रुपात झाली होती.
अजित यांचे अनेक डॉयलॉग प्रसिध्द आहेत.
मोना डार्लिंग, सारा शहर मुझे ‘लायन’ के नामसे जनता है, वाटस युवर प्रॉब्लम?, आई लास्ट मई ग्लासेस, स्मार्ट बॉय , हव वैरी इंटरेस्टिंग… लिली डोंट बी सिली, मोना लूटलो सोना,
अजित यांचा कालीचरण मधील डायलॉग तर खूप गाजला होता,तो म्हणजे “मै तुम्हे लिक्वीड ऑक्सीडजनमे रखुंगा. लिक्वीड तुम्हे जीने नही देगा, ऑक्सीतजन तुम्हे मरने नही देगा‘.
अजीत यांचे २२ ऑक्टोबर १९९८ रोजी निधन झाले. अजीत यांना आदरांजली.
Leave a Reply