आपल्या सर्वांच्या परिचयाची ब्राम्ही,तिचे कार्य मेंदुवर होते व बुद्धि व स्मरणशक्ती वाढवायला हिचा उपयोग होतो हे आता सगळ्यांनाच माहीत आहे.तरी तिचे अजुन काही उपयोग आहेत का ते देखील आपण जाणून घेणे गरजेचे आहे.चला तर मग ब्राम्हीची माहिती पुन्हा नव्याने जाणून घेऊ.
ब्राम्हीचे जमिनीवर पसरणारे क्षुप असते.ह्याची पाने अखंडधार युक्त व मांसल असतात.ती मऊ व गुळगुळीत असतात.तसेच त्यावर सुक्ष्म काळे ठिपके असतात.ह्याला जांभळी,पांढरी किंवा गुलाबी फुले येतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे पाने.ब्राम्ही चवीला कडू,तुरट,गोड असून थंड गुणाची व हल्की असते.हिचा प्रभाव मानस रोगांवर चांगला होतो.ब्राम्ही त्रिदोषशामक आहे.
चलातर आता हिचे उपयोग जाणून घेऊया:
१)आमवातावर ब्राम्हीचा रस सांध्यांवर लावतात.
२)मानस रोगात ब्राम्हीचा रस उपयुक्त आहे.
३)ब्राम्हीचे चुर्ण मधासोबत घेतल्यास बुद्धि व स्मरण शक्ती वाढते.
४)डांग्या खोकल्यात ब्राम्हीचा अवलेह उपयुक्त आहे.
५)ब्राम्ही शरीरातील सात ही धातुंचे पोषण करते व रसायन कार्य करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply