भगवान श्री गणेशांच्या उजव्या हाताला विराजमान असणाऱ्या श्री गणेश शक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. भगवान तिला आपल्या उजव्या हाताला स्थान देतात यातच तिचे श्रेष्ठत्व अधोरेखित आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळात गाणपत्य संप्रदायात श्री महाबुद्धी नवरात्र संपन्न केले जाते.
अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी सूर्यास्त समयी देवी बुद्धी प्रगट झाली असल्याने त्यादिवशी महाबुद्धी जन्मोत्सव संपन्न केला जातो. त्यामुळे अश्विन प्रतिपदा ते नवमी हे नवरात्र बुद्धी नवरात्र रूपात संपन्न होते.
मानवी जीवनातील सर्वात श्रेष्ठ आनंद म्हणजे ज्ञानाचा आनंद. ते जगातील ज्ञान विविध बोधांच्या आधारे होत असते.
पंचज्ञानेंद्रियांच्या आधारे जगातील विविध पदार्थांचा होणाऱ्या त्या बोधाचा आधार असणारी शक्ती म्हणजे देवी बुद्धी.
आपण देवी बुद्धींच्या नऊ नावांचे चिंतन करीत तिचे बौद्धिक अनुष्ठान करू.
ही बुद्धी भगवान श्रीगणेशांची अत्यंतप्रिय भामिनी असल्याने, ती भगवान गणेशांच्या कृपेने कार्य करीत असल्याने भगवान श्रीगणेशांना बुद्धिपती असे म्हणतात.
— प्रा. स्वानंद पुंड.
Leave a Reply