नवीन लेखन...

व्यवसाय प्रशिक्षण – एक सतत चालणारी प्रक्रिया

शाळा-कॉलेजमधले आपले शिक्षण पूर्ण झाले. शैक्षणिक वर्षाला एक पूर्णविराम असतो. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही हुशार, चाणाक्ष विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊन प्रशासकीय सेवेत रुजु होतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास खुप जोरात, जोषात,मोठ्या तयारीने होतो. कारण तो जीवनरणाचा प्रश्न असतो. नोकरी लागण्याचे वय संपण्याच्या आत तो मनापासून केलेला अभ्यास एक दिलासा देतो की एवढे थोडे दोन-चार वर्षे चांगला अभ्यास केला की नंतर सरकारी नोकरी मिळेल. मग सतत एवढा अभ्यास करण्याची गरज नाही. पण मित्रांनो, हे पूर्ण सत्य नाही. एकदा नोकरी लागल्यानंतर ती टिकवून ठेवण्यासाठी, उच्च पदावर जाण्यासाठी पुन्हा अभ्यास करावाच लागतो.

व्यवसायात आणि पेशातही तसेच आहे. फरक एवढाच आहे, प्रशासकीय सेवेत असणार्‍या किवा बँक कर्मचार्‍यांना स्वतःच्या पैशांतून प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. व्यावसायिकाला मात्र धंद्यात टिकून राहण्यासाठी अपडेट राहण्यासाठी स्वतः पदरचे पैसे खर्च करावे लागतात. एखाद्या प्राध्यापकाला संशोधन करण्यासाठी स्टेशनरी, संदर्भ ग्रंथ, वृत्तपत्र इत्यादी फारसा खर्च नसेल; वाचनालयासारखी सुविधा कॉलेजच्या आवारातच उपलब्ध असतात. तसे व्यावसायिक पेशा, डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांना मात्र व्यवसायवृद्धीच्या शिक्षणासाठी स्वतःचेच योगदान द्यावे लागते. व्यावसायिक पेशाव्यतिरिक्त असणारे व्यवसाय म्हणजे डॉक्टर, वकील, इंजिनिअर सोडून तरलरींळेप लाही प्रशिक्षणाची गरज आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास प्रत्येकास डारीींहिेपश किवा ख-झहेपश वापरता आला पाहिजे. त्यासाठी नविन प्रकारचे मोबाईल, मशिनरी हाताळता आले पाहिजे. व्यवसाय करतांना आपले स्पर्धक काय नविन योजना आणतात; ग्राहक आपणांकडे टिकून राहावा म्हणून कोणकोणत्या युक्त्या, प्रवृत्त्या अवलंबतात त्याची आपणांस माहिती हवी. तशी माहिती वाचनाने, ग्राहकांशी संवादाने, यु-ट्युबमुळे मिळू शकते.

असं म्हणतात, एखादा पेशंट जुन्या डॉक्टरकडेच नेहमी त्याची तब्येत दाखवतो, फॅमिलीडॉक्टर काहीतरी गोळ्या-औषधे लिहून दाखवतो. पण पेशंटला फरक काहीच पडत नसल्याने सेकंड ओपिनियन म्हणून दुसर्‍या डॉक्टरकडे दाखवतो तेव्हा दुसरा डॉक्टर म्हणतो की, ‘‘पहिला डॉक्टर काय मुर्ख, वेडा होता. यापूर्वी दिलेल्या ट्रिटमेंटने आजार बरा होण्याऐवजी तो वाढतच गेला? वरील उदाहरणाप्राणेच प्लंबर, सुतार, इलेक्ट्रीशिअन्स, इंजिनिअरनेही आपल्या गिर्‍हाईकास नवनवीन कल्पना दिल्या तर आपला customerआपणाकडे टिकून राहील.

असं म्हणतात, एखाद्या गिर्‍हाईकाला जर आपण चांगली सर्व्हिस दिली तर तो फक्त चार ते पाच नविन लोकांना आपल्याबद्दलची माहिती पुरवतात; पण आपणाकडून जर वाईटरित्या सर्व्हिस दिली गेली तर तो शंभर लोकांना सांगतो. म्हणून आपल्या ग्राहकाने आपली बदनामी पसरवू नये असे वाटत असेल तर गिर्‍हाईकाचा फायदा कसा होत राहील याकडे लक्ष द्यावे लागेल. गिर्‍हाईकाचाही खर्च सातत्याने कमी कसा होईल; गिर्‍हाईक आपणाकडे कसा टिकून राहील याच्यावर जोर, भर द्यावा लागेल. प्रत्येक व्यावसायिकास चांगले संवादकौशल्य आले पाहिजे. किान तीन ते चार भाषांचे ज्ञान अवगत करण्याची इच्छा किवा आवड असावी. भाषा पंडिताएवढे नसले तरी आपल्याला आपल्या गिर्‍हाईकाला एकांतात आपल्या वस्तु व सेवांचे महत्त्व पटवता आले पाहिजे. आपल्या स्पर्धकांच्या हालचालींवर बारीक लक्ष असावे.

बदल हा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. आपल्या क्षेत्राशी असलेल्या कायद्यातील बदल समजुन घेतला पाहिजे. प्रत्येक व्यवसायात सातत्याने बदल होतात. बँड पार्टीत कम करणार्‍यांनाही नविन गाणे बसवावे लागते. पूर्वी टेप, व्हीसीआर रिपेअर करणार्‍यांनी टीव्ही किवा मोबाईल रिपेअरिंग शिकल्यामुळे ते व्यवसायात टिकून आहेत.

गिर्‍हाईकाला, नोकराला, सहकार्‍याला एखादा मुद्दा, गोष्ट समजून सांगण्यासाठीही स्वतः व्यावसायिकाला ती समजली पाहिजे. आधी आपणांस आले तर दुसर्‍यास समजावता येईल. त्यासाठी व्यावसायिकाने नेहमी शिकत असले पाहिजे.

बँक ऑफमहाराष्ट्रचे “ग्रामीण प्रशिक्षण केंद्र” किवा महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ MCED इ. तर्फे बर्‍याच वेळा EDP प्रोग्रॅम घेतले जातात. उद्योजकांनी सातत्याने त्याचा लाभ घेतल्यास व्यवसायातील बारीकसारीक खाचखळगे समजतील.

— सदाशिव गायकवाड

करसल्लागार, नाशिक.

फोन. (०२५३) २५९३५०७, ९३७१५२७१११

सदाशिव गायकवाड
About सदाशिव गायकवाड 3 Articles
श्री सदाशिव गायकवाड हे नाशिक येथे करसल्लागार आहेत. ते `कर' या विषयावर विविध ठिकाणी व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..