नवीन लेखन...

विमानांपेक्षा मोटारींचे अपघात जास्त का?

विमानाचा चालक आणि मोटरगाड्यांचे चालक यांची जर आपण तुलना केली तर या दोन्ही चालकांचे शिक्षण, त्यांचे वाहन चालवण्यासंबंधीचे प्रशिक्षण, किती तासांचा सराव झाल्यावर वाहन हातात मिळते त्याचा कालावधी, वाहन चालवत असताना पाळायची शिस्त, वाहनाच्या बांधणीतील सुरक्षा प्रणाली, वाहनांची मार्गातील संख्या (किंवा वाहतुकीची घनता), नियंत्रणातील नेमकेपणा आणि सुसूत्रता या गोष्टींविषयी विचार करावा लागतो.

आपल्यापैकी बहुतेकजण मोटर चालवायला शिकतो ते आपले वडील, भाऊ, काका, मामा यांच्याकडून. ते सगळेच काही फार पद्धतशीरपणे शिकलेले नसतात. हल्ली मात्र लोक मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन शिकू लागले आहेत. परंतु तेथल्या शिक्षकांनाच शास्त्रशुद्ध शिकवण्याचे ज्ञान नसते. काही काही मोटर ड्रायव्हिंग स्कूल परवान्याच्या फीसह त्यांची फी घेतात, जणू काही सगळ्यांनाच परवाना मिळणार असतो.

संरक्षणात्मक ड्रायव्हिंग हा आणखी एक महत्वाचा भाग आहे. हे तंत्र आपल्या देशात फारसे कोणाला माहित नाही. या उलट वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा दर्जा उच्च असतो. त्यात नेमकेपणा आणि शिस्त असते. कॅप्टन किंवा को-पायलटसाठी लागणारी पात्रता काटेकोरपणे तपासली जाते. सराव वारंवार करावा लागतो. इतके कडक शिक्षण झाल्यावर वैमानिक विमान नीट चालविणारच ! त्याची दररोज शारीरिक तपासणी होते व मद्याचा अंमल अथवा हँगओव्हर असेल तर त्याला त्या दिवसाचे काम मिळत नाही. उलट त्याच्यावर कारवाई होते.

आपल्या देशात फार मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर असतात. त्यातही काही सावकाश चालणारी तर काही वेगवान असतात. आकाशात तसे नसते. काहीवेळा विमाने उतरताना किंवा वर जाताना गर्दी असते पण सगळे काम क्रमवारीने होते. कोणी मध्ये घुसत नाही. विमानाच्या हालचालीत नियंत्रण असते आणि त्यात सुसूत्रता असते. रस्त्यावरच्या नियमांचे काटेकोरपणे पालन परदेशात होते तसे आपल्याकडे होत नाही. तसे झाल्यास आपल्याकडील रस्त्यांवरचे अपघातही कमी होतील. या शिवाय मोटारींची देखभालही काटेकोरपणे व्हायला हवी. टायरची आणि इंजिनाची तपासणी वारंवार व्हायला हवी.

– डॉ. अविनाश वळवडे, पुणे
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..