मानवी रक्तगट शोधणारा कार्ल लँडस्टायनर यांचा जन्म १४ जून १८६८ रोजी व्हिएन्ना येथे झाला.
व्हिएन्ना विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर जैविक संशोधन कार्याला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. मानवी रक्त हा त्यांचा संशोधनाचा प्रमुख विषय. त्यांनी संशोधन करेपर्यंत सर्व मानवजातीच्या शरीरात एकाच प्रकारचे रक्त असते असा समज प्रचलित होता; परंतु त्या काळी युरोपातील रुग्णालयात जखमी सैनिक आणि इतर रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्यास सरसकट कोणाही रक्तदात्याचे रक्त दिले जाई. रुग्णाच्या शरीरात हे दुसऱ्याचे रक्त गेल्यावर बहुतेक वेळा रक्तात गुठळ्या तयार होत आणि रुग्ण किंवा सनिक दगावण्याच्या घटना होत असत. अशा अनेक घटना घडल्यावर व्यक्तीव्यक्तींच्या रक्तात काही तरी फरक असला पाहिजे अशी लँडस्टायनरना शंका येत होती. रक्तविषयक संशोधनाचा त्यांनी ध्यास घेतला. १८९४ ते १९०० या सहा वर्षांत त्यांनी ३६०० व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेऊन त्याचे विश्लेषण केले.
१९०० साली आपल्या संशोधनातून त्यांनी मानवी रक्ताचे ‘ए’, ‘बी’, ‘ओ’ व ‘एबी’ असे चार गट असल्याचा निष्कर्ष काढला. प्रथम तत्कालीन वैद्यकवर्ग हे मानायला तयार नव्हता; परंतु १९०७ साली न्यूयॉर्क येथील इस्पितळातील एका जटील शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर लँडस्टायनरनी ब्लड ट्रान्स्फ्युजनचा यशस्वी प्रयोग करून आपले संशोधन सिद्ध केले. पहिल्या महायुद्ध काळात तर शेकडो जखमी सैनिकांना त्याच्या रक्तगटाप्रमाणे त्यांना रक्त देऊन या संशोधकाने हजारो सैनिकांचे प्राण वाचवले. याच संशोधनात त्यांनी मानवी रक्तात ‘अल्ग्युटिनीन’ नावाचे घटक द्रव्य असते आणि त्याच्यामुळे रक्तात गुठळी होते असाही शोध लावला.
त्यांनी केलेल्या संशोधनांमध्ये पोलिओबद्दलचे संशोधनही मौलिक समजले जाते. पुढे त्यांनी १९३७ साली केलेल्या संशोधनात ‘ऱ्हेसस फॅक्टर’ या रक्तातील घटकाचा शोध लावला. त्यातून रक्ताची आरएच पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह अशीही वर्गवारी करता येऊ लागली. आजही रक्तगटांच्या या वर्गवारीचा कार्ल लँडस्टायनर यांचे २६ जून १९४३ रोजी निधन झाले.
Leave a Reply