ऐतिहासिक स्वातंत्र्य संग्रामामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिकांचा फार मोठा वाटा होता. देशी वृत्तपत्रांचे मालक आणि संपादक यांचा थेट किंवा अप्रत्यक्षरित्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होता. त्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून ते आजच्या सोशल मीडिया, वेब पोर्टल आणि ऑनलाईन पत्रकारितेच्या जमान्यापर्यतच्या जवळपास सव्वा दोन शतकाच्या दीर्घ प्रवासात वृत्तपत्रसृष्टीला अनेक स्थित्यंतराला सामोरे जावे लागले आहे. […]
ग्रंथ प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात सहकारी तत्वावर कार्य करणान्या ‘साहित्य प्रवर्तक सहकारी संस्था, कोट्टायम’ या केरळ राज्यातील संस्थेच्या कार्याचा तपशील पुढे दिला आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थित ग्रंथव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर या प्रयोगाचे कार्य लक्षात घेणे अगत्याचे आहे असे वाटते. […]
जागतिक, राष्ट्रीय, प्रांतीय अशा सर्वच जागी अशांतता असेल तर समाज, कुटुंब आणि वैयक्तिकरीत्या माणूस हा देखील स्वस्थ राहू शकत नाही. जगण्यासाठीचा माणसाचा संघर्ष आज कैक पटींनी वाढलेला आहे. म्हणून प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे. असमाधानी आहे. […]
वय वाढत जातं तसं एकेक जवळच माणूस दुरावतो. वर्षानुवर्षे असलेली साथसंगत हरवते. एकटेपण कधी मनाला बोचते. तर कधी काहीशा गमतीदार प्रसंगानाही सामोरे जावे लागते. अशाच काही भावनाशील, प्रेमळ अनुभवांचा कोलाज! […]
‘बावळट, खेडवळ’ अशी बिरुदे घेऊन सासरी ठाण्यात मी प्रवेश केला. शहरात एवढी गर्दी कशी? एवढ्या मोठ्या ट्रेनमधून लोक कुठे जा-ये करतात? नेहमी लग्नाला निघाल्यासारखे, नीटनेटक्या कपड्यात कसे असतात? बायकासुद्धा छान छान साड्या नेसून रोज ऑफिसला जातात. रात्रीसुद्धा दुकानात दिवसासारखा झगमगाट असतो. […]
मी कथा विषयी बोलणार आहे, पण हे मी माझ्या कथांचे संदर्भ घेऊन बोलणार आहे.कथा म्हणजे काय? काल्पनिकते मध्ये वास्तविकता किंवा वास्तविकते मध्ये काल्पनिकतेचे मिसळ करून व्यक्त होणे.सर्वस्वी वास्तविक किंवा सर्वस्वी काल्पनिक असे काहीच नसते. पण विचार आणि चिंतन ही लेखकाची शिदोरी आहे. यातून जी जन्म घेते ती कविता किंवा कथा. […]
मी सर्वप्रथम अमेरिकेत अपूकडे गेले ती 1998 साली.म्हणजे 25 वर्षांपूर्वी…. !पहिल्यांदाच विमानाचा प्रवास..आणि तो देखील इतक्या दूरचा आणि एकटीने करायचा… ! मी मुंबईतही कधी एकटीने प्रवास केल्याचं मला आठवत नाही.सासरी जायचं असो नाहीतर माहेरी जायचं असो. […]
मी शाळा शिकत असताना अभ्यासाबरोबर साहित्याचे लेखन सुद्धा करीत असे. बालभारती पुस्तकातील धडे किती सुंदर असतात यामुळे मला एक लिहिण्याची उर्मी येत असे. आपणही थोडेफार लेखन करावे असे माझ्या मनाला मनोमन वाटत होते. शाळा शिकत असतानाच नाटकात काम करण्याचा छंद मला लागला होता व भजनात सुद्धा माझे मन गुंतत होते. वडील जिवंत होते तोपर्यंत मी अधून मधून लेखन करीतच असे. […]