नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

नागपंचमीची धमाल

आजही लहानपणचा तो किस्सा आठवला की मलं खूप खुप हसू येतं.ते झाड,ते सणाचे वातावरण,त्या परंपरांना मी खुप मिस करतो. त्या सगळ्या गमती जमती आता इतिहास झाल्यातं असं वाटाया लागतं..आताशा गावंही बदललीतं,हिरवाई कमी होऊन तिथबी सिमेंटचे जंगलं वाढलीतं.काळासंगटच परंपराबी बदलल्यातं…आठवणी मात्र तशाच आहेत….!!! […]

ती अन् मी

आज हे गाणं ऐकलं आणि तुमच्यासमोर थोडसं व्यक्त व्हावसं वाटलं. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी बरंच काही गमावलं आहे. पुन्हा माणसाला माणसाची किंमत कळली आहे. पैसा, भौतिक सुखांच्यापेक्षाही कितीतरी पट अधिक माणसांना माणूसच हवा याची जाणीव झाली आहे. […]

सुंदरतेची मूर्ती

सुंदरतेचा म्हणजे सुंदर दिसण्याचा ध्यास कोणाला नाही? पुरुष असो की स्त्री, लहान असो की मोठा, खेडयातला असो की शहरातला, पैसेवाला असो की गरीब… सुंदर दिसण्याची धडपड सर्वांचीच आणि सर्वकाळ! सर्वकाळ अशासाठी की आजची तरुणी स्वतःला सजवण्यात जशी मग्न तीच वृत्ती रामायण, महाभारतातील स्त्रियांमध्येही होती! प्रसाधनाची माध्यमं बदलली, सौंदर्याचे निकष बदलले पण स्वतःची आरशातली छबी तद्वत लोकांच्या नजरेतली पसंती, छान या सदरात मोडावी, हाच उद्देश ‘सुंदर मी होणार’ ह्यापाठी असतो. […]

शहाणं बाळ

शहरीकरणानंतर घरातल्या दोघांनी काम करणं आवश्यक झालं, मग त्यातून शहरातल्या लहान जागेमुळे आजी आजोबा गावी आणि मुलं शहरात. कुटुंब लहान होत गेली, त्यातून मुलांवर संस्कार करणारी पिढीच नामशेष होऊ लागली. त्यामुळे मुलंही त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ वेगळाच घेऊ लागली आणि नको त्या संगतीत रमू लागली तेव्हा कुठेतरी सहिष्णुतेचे गणित बिघडू लागलं आणि मग अरेरावी, मुर्दाडपणा, फक्त मी आणि मी ही भावना वाढू लागली. […]

प्रसार माध्यमं आणि साहित्य

‘प्रसार माध्यमं आणि साहित्य’ याचा विचार करताना प्रसारमाध्यमं म्हणजे नेमके काय अर्थ समजावून घेतला पाहिजे. आपल्या विचारांचा, भावनांचा, लेखनाचा वा अन्य कलाप्रकारांमधून व्यक्त होणा-या कृतींना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहक अथवा साधक म्हणून कार्य करणारी यंत्रणा म्हणजे माध्यमं होत: […]

आळस

मंडळी सप्रे म नमस्कार ! आजचा विषय आहे आळस. आता विषयावर लिहायचं तर विषयाच्या बाजूने किंवा विषयाच्या विरुद्ध असंही लिहिता येतं ! तसं पहायला गेलं तर विरोधी पक्ष खूप सोपा ! […]

ऋण सद्गुरूचे

संत कसे बोलतात, कसे चालतात, निरनिराळ्या परिस्थितीत कसे वागतात, कसे निर्भय असतात, कसे निःस्पृह असतात, किती निरिच्छ, किती मृदू, परंतु किती निश्चयी, कसे निरहंकारी, कसे सेवासागर, किती निरलस, किती क्षमी, कसे त्यांचे वैराग्य, कशी निर्मळ दृष्टी, कसा विवेक, कसा अनासक्त व्यवहार, – हे सारे त्यांच्या सहवासात नित्य राहिल्यानेच समजत असते. […]

गोकुळ म्हणजे काय?

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र व दुसरा द्वारकेचा राणा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले, पण या दोन राजांचे स्थान अटळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणताही सत्ताधीश बसू शकणार नाही. भारतीय संस्कृती म्हणजे राम-कृष्ण. […]

पाहारेदार

सातपुड्याच्या पायथ्याशी येळकोटवाडी नावाचं गाव व्हतं. साधारण दीड दोन हजार वस्तीचं गाव.. गाव तसं लहानच… गावाला खंडूबा प्रसन्न व्हता… गावात शिरताच म्होहर च खंडूबाचं देवुळ व्हतं …या खंडूबाच्या देवळाच्या रावळात एक माणूस बशेल असायचा… दिसा तो नसायचा पण रातीला तो तिथंच गवसायचा… त्याचं नाव पांडबा… […]

पुरुषपण भारी देवा

कायओ?काय चाललंय!बसले का लॅपटॉप उघडून!रविवार आहे ना?तरी सुद्धा काम?बाहेर मस्त पाऊस पडतोय..छान वातावरण आहे..चल जावू कुठंतरी!नाहीतर फिरायला..सिनेमाला नाटकाला!स्वतःहून कधी म्हणायची इच्छा होत नाहीका हो तुम्हाला?म्हटलं आज उद्या कधीतरी स्वतःहून म्हणाल..चल जावू या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाला!पण कसलं काय!आपल्या सोसायटीतल्या सगळ्या जावून पाहून सुद्धा आल्या!त्याचं कायये कामा शिवाय काहींचं सुचत नाही ना आम्हाला!एक सांगा!आपण दोघं शेवटचं बाहेर कधी गेलो आठवत का?घरातलं करा तुमचं बघा!राब राब राबा.. सुट्टीची वाट पाहत रविवार पर्यत थांबा!पण नाही..बायकोला समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर इलाजचं खुंटला..खरंय ना? […]

1 60 61 62 63 64 516
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..