“अभिनंदन सुरुची तुझं प्रेझेन्टेशन फारच मस्त झालंय. तू ज्या गोष्टी आज मांडल्यास त्या ऐकून आपले डायरेक्टर तर फारच खूष झाले. आपल्या कंपनीच्या नवीन प्रोजेक्टसाठी तू जमवलेली माहिती आणि संशोधन अतिशय कौतुकास्पद आहे. नवीन प्रोजेक्ट नक्कीच यशस्वी होणार आणि त्यात तुझा महत्त्वाचा वाटा असणार’. ‘धन्यवाद सुजय… आणि हो… तुझंही अभिनंदन. कारण या प्रोजेक्टचा मॅनेजर तू आहेस… माझे […]
मला लहानपणापासून आवडणारा एकमेव प्राणी एकच, तो म्हणजे मनीमाऊ! गावी असताना कुठेही मांजरं दिसायची, ती राखाडी रंगाचीच. ती कधी जवळ यायची नाहीत. पकडायला गेलं तर फिसऽ करुन फिसकरायची. एखादं दुसरं पांढरं मांजर असेल तर ते चूल विझल्यावर राखेत बसून पार ‘गोसावडं’ झालेलं असायचं. कधी त्यानं दूधात तोंड घातलं तर त्याला माझी काकू चुलीवरची फुंकणी फेकून मारायची.. गावात फासेपारधी फिरताना दिसले की, मोठी माणसांनी सांगितलेलं आठवायचं.. फासेपारधी बोके पकडून नेतात व खातात.. […]
कोणत्याही गावातला पाऊस मला खूप आवडतो. कोकणातला आठ आठ दिवस संतत धार धरणारा पाऊस तर सर्वात आवडता. ठाण्याचा ही आवडतोच पण तो फक्त घरात बसून बघायला. आपल्याकडे पावसाळा हा सेपरेट ऋतू आहे आणि साधारण त्याच काळात आपण पाऊस अनुभूवू शकतो. लंडन मध्ये ही ऑक्टोबर ते जानेवारी असा ऑफिशियली पावसाळा जाहीर केलेला असला तरी इथे पाऊस वर्षभर आणि कधी ही पडतो. पावसामुळे क्रिकेटच्या किंवा विम्बल्डनच्या मॅच वर पाणी फिरल्याचे आपण अनेक वेळा बघितलं आहेच. […]
ग्रामीण भागामध्ये आषाढ महिन्यामध्ये म्हसोबाच्या मांसाहारी जत्रा चालू होतात. तर दुसरीकडे तीन वर्षातून एकदा ताई आईची यात्रा सुद्धा आषाढ महिन्यात होत असते. एकीकडे मुके चार पायाचे जनावर देवाच्या पुढे कापायचे. म्हणजे भाऊ किती लोकांना त्रास होत नाही अंगाला फोड्या येत नाहीत किंवा काळे भोंगे उठत नाहीत. अशी एक अफवा पारंपारिक पद्धतीने ऐकावयास मिळते […]
भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गायिला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दंभाचा पसारा सर्वत्र वाढल्यामुळे, दिखाऊपणाचे स्तोम जिकडेतिकडे माजल्यामुळे थोर गुरुभक्तीचे महान तत्त्व आज धुळीत पडले आहे. […]
टळटळीत दुपारी जेव्हा माझी बहीण आणि आमच्या इतर मैत्रिणी घराबाहेर गोट्या खेळायच्या तेव्हा केवळ मला ऊन सहन व्हायचे नाही म्हणून मी घरातच काहीतरी करण्याचा उद्योग केला. ‘आई आणि बाळ’ यांची चित्रे काढायला सुरुवात केली. आई आणि बाळ एकत्रितपणे कधी वर्तमानपत्रात, कधी मासिकात दिसायचे ते बघून बघून मी काढायचे आणि चक्क तीस दिवसात मी तीस चित्रे काढली. विषय एकच असला तरी प्रत्येक चित्र वेगळं होतं. […]
गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे विचार गोड आणि भव्य आहेत. मृत्यूची भीषणता आपल्या संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ. मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप. जीवन आणि मरण हे दोन्ही वस्तुतः एकरूपच आहेत. मरण नसते तर जग भेसूर दिसले असते. […]
जिमी वेल्स याचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल शहरात मध्यरात्री झाला . म्हणून त्यांची जन्मतारीख त्यांच्या जन्मदाखल्यावर 8 ऑगस्ट ही आहे. लहानपणी त्याचे वाचन खूप होते , तो अत्यंत काळजीपूर्वक वाचन करत असे. त्याचे वडील एका ग्रोसरीच्या दुकानांमध्ये मॅनेजर होते तर त्याची आई एक खाजगी शाळा चालवत होती […]
कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत, एवढ्या त्या एकरूप झालेल्या आहे. कुटुंबाची व्याख्या एकवेळ पुरुषाशिवाय पुरी करता येईलही, परंतु स्त्रीशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही. […]