आज कितीतरी दिवसांनी ती ही अशी घराबाहेर पडली होती. ना ती, पाण्याची बाटली आणि खाऊचा एखादा डबा, चार्जर्स, घड्या केलेल्या पिशव्या, असंख्य बिलं, पावत्या कोंबलेली ढबोळी पर्स, ना भाजीची किंवा डब्याची पिशवी, ना मळखाऊ, इस्त्री केला असलातरी सुरकुत्या पडलेला ड्रेस, आणि जेमतेम केसांवरून कंगवा फिरवला न फिरवला वाटावे असा अस्ताव्यस्त केशसम्भार. मस्त सोनसळी रंगाचा ड्रेस, छान, […]
दिल्लीतील बल्लीमारान भाग म्हणजे एक गजबजलेलं उपनगर.तिथे लाला केवलकिशन सिकंद हे एक सिव्हिल इंजिनिअर आपल्या पत्नी रामेश्वरीसह रहात असत.ते मूळचे पंजाबातील होशियारपूरजवळच्या भारोवाल गावचे.सैलाखुर्द स्टेशनवर उतरून ७ किलोमीटर दूरवर हे गाव […]
स्त्री यांना संधी मिळाली की त्या तिचे सोने करतात. स्त्रीशक्तीने आज आपली ताकद दाखविली आहे. आधुनिक स्त्रीचा विचार करताना ती आज लाचार नाही हे सहज दिसते. तिला शिक्षण मिळाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात, विश्वाच्या प्रांगणात तिने पाऊल टाकले. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांनी तर अवकाशाचा वेध घेतला. […]
अगदी क्वचित प्रसंगी मात्र खूप चांगला, सुखावणारा अनुभव येऊन जातो. त्या दिवशी असच झालं, मी बोरीवलीहून ठाण्याला जाणारी TMT ची वातानुकूलित बस पकडली. आत येऊन तोल सांभाळत पैसे काढण्यासाठी मी खिशात हात घालताच, कंडक्टरने अगदी आपलेपणाने मला आधी बसून घ्यायला सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला उठवून मला बसायला जागा दिली. […]
वर्षं किती भराभर जातात ना?दिवस तर एकामागून एक नुसते पळतच असतात…!आत्ताआत्ता पर्यंत माझे चारही नातू एवढाल्लेसे होते…बघता बघता चौघेही किती मोठ्ठे झाले..पिल्लं घरट्यातून कधी उडून गेली ते कळलंच नाही. […]
संत कबीरांच्या मते आत्मा अगम्य आहे. तो सांसारिक आणि भौमिकतेचा विषय नाही. तो आपल्या चर्म चक्षूने पाहण्याचा अथवा फक्त कानाने ऐकण्याचा विषय नाही तर दिव्य दृष्टीने अनुभव घेण्याचा विषय आहे. त्यांनी साधकांना ज्योती स्वरूपाच्या दर्शनात न थांबता पुढे नाम निःअक्षर (परमात्मा) पर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिलेला आहे. […]
महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीत नागपुर जिल्हा नेहमीच अग्रणी राहिलेला आहे.तसं पाहील तर आपल्या राज्यातील प्रत्येकचं जिल्ह्याची खाद्यसंस्कृतीत आपापली एक विशेष ओळख आहे. […]
लहान असेंन मी त्यावेळी आठवी नववीत जेव्हा त्यांचे लग्न झाले तो गावाकडचा पण शहरात स्थायिक झालेला, चांगली नोकरी होती परंतु लगेचं करत नव्हता. एकदाचे त्याने उशीरा का होईना लग्न केले. ती पण जरा जास्त वयाची होती, थोडी रखडलेली होती. कमी शिकलेली , मॅट्रिकपर्यंत घरात गावी सगळी कामे करत असे. […]
‘स्त्री म्हणजे काय आहे?’ या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देता येईल. स्त्री म्हणजे एक ‘अजूबा’ आश्चर्य आहे. परमेश्वराची अजोड निर्मिती आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या परिचक्रातील पहिली महत्त्वाची गोष्ट. उत्पत्ती – म्हणजे एखादी गोष्ट निर्माण होणे. स्थिती – म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आणि तिसरी स्थिती – लय म्हणजे एखादी गोष्ट संपून जाणे, विलय पावणे, मृत्यू. सर्व सृष्टी या परिचक्राला बांधलेली आहे. परंतु यातील – निर्मिती, उत्पत्तीची ताकद महत्त्वाची आहे. […]