एक परीस स्पर्श… ( भाग -२८ )
साधू त्यांना एक जादुई घोडा, काटी आणि झोळी देतो आणि त्यांच्या कानात एक मंत्र सांगतो. हा घोडा तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल..ही झोळी तुम्हाला हव्या त्या वस्तू देईल…आणि ही काटी तुमच्या शत्रूंचा नाश करेल…आणि ते साधू स्वर्गात प्रयाण करतात. ते दोघे बहीण भाऊ घोड्यावर बसतात आणि मंत्र म्हणून घोड्याला आदेश देतात आमचे आईवडील ज्या राज्यात असतील तेथे आम्हाला घेऊन चल…क्षणात ते घोड्यासह आटपाट नगरात पोहचतात…तेथे पोहचल्यावर ते झोळीतून मंत्राच्या साह्याने मोहरा निर्माण करतात आणि एक वाडा विकत घेतात…आपल्या राज्यात कोणी श्रीमंत बहीण भाऊ राहायला आल्याची बातमी राजदरबारात पोहचते… दृष्ट राणीला त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण होते… […]