नवीन लेखन...

पावसाचं आगमन

पण नरिमन पॉइंटवर पांढऱ्या शुभ्र झग्यातले, डोळ्याला पांढरं मुंडासं वर काळी फीत लावलेले अरबस्तानातील लोक जमायला लागले, की समजावं आता पावसाळा आला. वाळवंटात राहणारी ही मंडळी. त्यांना पावसाचं विलक्षण आकर्षण. पावसापेक्षा पावसाच्या आगमनाचं, पहिल्या पावसाचं. […]

इस्पिकची राणी (संक्षिप्त रूपांतरीत कथा २०)

मेजर शिंदे यांच्या घरी रात्रभर पत्त्यांचा जुगार चालू होता. सकाळी पांच वाजतां नाश्ता दिला गेला. तोपर्यंत जिंकलेल्यांनी तो खूप आवडीने खाल्ला तर हरणाऱ्यांच्या तोंडाची चव गेली होती. एकजण म्हणाला, “माझं नशीब जुगारांत नेहमीच दगा देतं.” एकाने दुसऱ्या एका इंजिनीअर्सच्या तुकडीतील हरीरामला विचारले, “हरीराम, आश्चर्य आहे ! तू कधीही पत्त्यांना हातही लावत नाहीस ! तरीही तू आमच्याबरोबर […]

मायाबाजार

कुणी विकतं, कुणी खरेदी करतं, पण काही खरेदी करण्यापूर्वी कमवावं लागतं. मग ज्याच्याकडे जे असेल ते जास्तीत जास्त भावात विकलं जातं. कुणी बुद्धिमत्ता विकतं, कुणी सत्ता विकतं, कुणी जरब विकतं, कुणी देवाने दिलेले सौंदर्य विकतं, तर कुणी त्याच्याच शेजारी आपले वैगुण्य घेऊन विकायला बसतं. मायाबाजार चालू राहतो.  […]

नांव देण्याची हौस

या नांवाचा आग्रह केलेला नगरसेवक आज हयात नाही. त्या रस्त्यावरच्या एकाही नागरिकाला ही व्यक्ती कोण माहित नाही. महापालिकेच्या कचेरीत काम करणाऱ्या कुणालाही या रस्त्याच्या या व्यक्तीचं नाव का दिलं माहित नाही. ज्यावेळी हा ठराव झाला त्यावेळची कागदपत्र काढून बघण्यात आली, पण त्यातही त्या व्यक्तीविषयी काहीच माहिती नाही. […]

अपना लक पहन कर चलो! (कथा)

मी घातलेला सदरा कुणीतरी माझ्या शरीरावरून अलगदच वेगळा केला होता, इतका की मलाही कळले नव्हते. बसमध्ये माझ्या मागच्या सीटवर बसलेल्या कुणीतरी कात्रीने हे कृत्य फारच सावधगिरीने आणि कलाकारीने केले होते. मी बसमध्ये डुलक्या घेत होतो. […]

काजळ भरलेले डोळे (कथा)

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये अरूणेंद्र नाथ वर्मा यांनी लिहिलेली ही कथा. ती जणू बोलायचं म्हणून बोलत होती. खूप क्षीण आवाजात मिसेस तिवारीने मनोजला म्हटले, ‘कोमा ताले वू’ आणि आपला नाजूकसा उजवा हात त्याच्यासमोर केला. मनोज चकित झाला. त्याच्या एवढंही लक्षात आलं नाही की फ्रेच भाषेत ओळख करून देताना/घेताना ‘हाऊ डू यू डू’साठी वापरलेल्या वाक्याचं उत्तर […]

गहिवर (कथा)

दिवाळी जवळ आली रे आली की रामजी शेठजींचा मूड एकदम बिघडायचा. एक माणूस म्हणून ते चांगले होते पण पदरचा पैसा गेला की त्यांचा जीव कासावीस होत असे. गणपती उत्सवाला शेकड्यांनी वर्गणी द्यायला लागायची. […]

खंडूबा माझ्या साथीला (कथा)

बालेवाडीच्या क्रीडा संकुलाबाहेर जत्रेचं स्वरूप आलं होतं. संकुलाच्या प्रमुख प्रवेशद्वारापुढे भली मोठी कमान उभारलेली होती त्यावर लक्ष घेणारा लांबलचक कापडी फलक लटकवलेला होता, “अखिल भारतीय राज्यातंर्गत मैदानी स्पर्धा २०१९.” […]

समोरच्या खिडकीतला तो..

सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो. […]

लोकल

पहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग, इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरांसारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा ? आपल्याला तर गुदमरल्यासाखं होतं. परगांवाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजचं करीत राहतो. […]

1 42 43 44 45 46 112
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..