मिसेस पॅकलटाईडचा वाघ (संक्षिप्त व रूपांतरीत कथा १७)
साकी ह्या टोपण नावाने मुनरोने बरंच लिखाण केलं. तो विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द होता. ही एक अशीच विनोदी कथा. भारतात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका स्वतःला राजघराण्यांतल्याच समजत. येन केन प्रकारेण प्रसिध्दी मिळवायचा त्या प्रयत्न करीत. पोकळ बडेजाव मिरवीत. अशाच एका इंग्रज बाईने वाघ मारला, त्याचं नर्म विनोदी वर्णन कथेत आलं आहे. खरी गोष्ट माहित असलेली तिची पगारी जोडीदार मात्र त्या संधीचा योग्य वेळी स्वत:ला घर मिळवण्यासाठी करून घेते व चोरावर मोर बनते. […]