संस्कृत साहित्यातील कथा – क़मांक १ – अभिज्ञानशाकुंतलम्
नवीन मालिकेत संस्कृत साहित्यातील काही नाटकांच्या, काव्यातील किंवा गद्यातील कथा सांगणार आहे. ह्यापूर्वी मी मृच्छकटिक नाटकाची कथा आपल्याला सादर केली होती. संस्कृत साहित्य म्हटल्यावर नेहमीच पहिले नांव कालिदासाचे येते. “पुरा कविनां गणनाप्रसंगे कनिष्ठीकाधिष्टीत कालिदास:। ततस्तत्तुल्यकवेर्भावात् अनामिका सार्थवती बभूव॥ पूर्वी श्रेष्ठ कवींची गणना करतांना करंगळीवर प्रथम कालिदासाचे नांव घेतले. मग त्या तोडीचा कवी न मिळाल्याने अनामिका हे […]