उमलणारी फुले
चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें मधू शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास, चैतन्यमय […]