अरविंद इनामदार यांना खोटे, आणि चुकीचे घडलेले कधीही खपत नसे. म्हणूनच त्यांनी आपली कारकिर्द पणाला लावून कायम पोलीस दलातील वाईट गोष्टींवर सतत बोट ठेवले. या सद्गुणांचा मोठा फटका आपल्याला बसल्याचेही ते वारंवार मुलाखतींमधून सांगत असत. […]
धूमकेतू म्हटलं की, आपल्याला लगेच आठवतो तो ‘हॅले’ चा धूमकेतू. या धूमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नावावरून दिलं गेलं. १६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. […]
रणदिवेंना वासंती देवी अमीरचंद पुरस्कार, वाटुमल फाउण्डेशनचा पुरस्कार, सॅडो अवॉर्ड, टाटा मेमोरियल सेंटरचे सुवर्णमहोत्सवी मानचिन्ह व बनारस हिंदू विद्यापीठाचा पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांची इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेत ‘फेलो’ म्हणून निवड झाली. महाराष्ट्र राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान समितीच्या सदस्या असताना त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ ही पदवी बहाल करून राष्ट्रपातळीवर त्यांच्या कार्याचा गौरव केला. […]
आपल्या घरच्या पारंपरिक वाद्यनिर्मिती व्यवसायात काम करता करता, वयाच्या चोविसाव्या वर्षी बेस क्लॅरिनेटची निर्मिती केली. पॅरिसमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतर प्रयोग करता करता सॅक्सोफोन, सॅक्सट्रोम्बा, सॅक्सहॉर्न, सॅक्सट्यूबा अशा वाद्यांचा शोध लावला. […]
पहिल्या महायुद्धात मॅडम क्युरी यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी फिरती रेडिओग्राफीची एक मोटार तयार केली आणि अनेक जखमी सैनिकांवर उपचार केले. या मोटारीकरिता लागणारी ऊर्जा रेडियम निस्सारणातून निर्माण होणा-या रंगहीन वायूमधून मिळत असे. हा वायू म्हणजे रेडॉन हे नंतर समजले. […]
स्कूबी हा कुत्रा आणि त्याला पाळणारे मित्रमंडळ, कोठेही काही चुकीचे घडत असेल तर तेथे पोहोचते पण दांडगटांपुढे आपले काही चालणार नाही असे त्यांना वाटत असतानाच स्कूबीच्या करामतींमुळे, दुष्टांना धडा शिकवला जातो, अशा स्वरूपाची ही मालिका मुळात जॉन केनेडींच्या हत्येनंतर, ‘चित्रवाणी सचेतपटांमध्ये फार हिंसाचार असतो’ या तक्रारीला उत्तर म्हणून सुरू झाली. […]
कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. […]
बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की, ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने, ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत. […]
गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘चेलुवी’ या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या सोनालीने केवळ देशांतच नव्हे, तर परदेशातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. […]
अनंतफंदीस “फंदी” नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले […]