नवीन लेखन...

सेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान

सेल्युलर जेल (काळे पाणी)  – पोर्ट ब्लेअर अंदमान

अंदमान म्हटले की कोणालाही प्रथम आठवण होते ती महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची. त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीची, असीम त्यागाची आणि त्यांनी भोगलेल्या यातनांची. त्यामुळे अंदमानला भेट द्यायचे बरेच दिवसापासून  मनात होते पण योग आला यावर्षीच्या जानेवारी महिन्यात. “Parth Travels डोंबिवली” तर्फे अंदमान सहल  आयोजित केली होती. सहलीसाठी आमचा २४ जणांचा ग्रुप होता. आम्ही मुंबई वरून पहाटे सुटणाऱ्या विमानाने पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर विमान तळावर सकाळी साधारण ७.१५ च्या सुमारास पोचलो. आमच्या राहण्याची सोय हॉटेल “ब्लू सी” मध्ये केली होती. हॉटेल मध्यवर्ती ठिकाणी होते. बाकी पण सर्व व्यवस्था खूप छान होती.

पहिल्या दिवशीच आम्ही कुप्रसिद्ध सेल्युलर जेलला भेट दिली. कारण ग्रुप मधील सर्वच जण सावरकर प्रेमी. त्यामुळे ह्या महान देशभक्ताने जिथे आपल्या आयुष्याची अनेक वर्षे व्यतीत केली त्या वास्तूला भेट देण्यासाठी आम्ही सर्व जण उत्सुक होतो तसेच या जेलचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतो.  १९७९ साली भारताचे माजी पंतप्रधान कै. मोरारजी देसाई यांनी “सेल्युलर जेल” ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली. त्यामुळे आता आपणाला या जेलची सर्व माहिती व्यवस्थित स्वरुपात उपलब्ध झाली आहे. आम्ही  गाईड केला होता. त्याने आम्हाला सर्व जेलचा परिसर दाखवला आणि संबधित इतिहास पण सांगितला. काळ्यापाण्याच्या शिक्षेविषयी लहानपणापासून ऐकत आलो होतो. भारतातील स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणाऱ्या जहाल राजकीय कैद्यांना देशापासून दूर अशा ठिकाणी अनेक हाल अपेष्टा भोगण्यासाठी त्याकाळी ब्रिटीश सरकारने या जेलची निर्मिती केली. याचे बांधकाम १८९६ साली सुरु झाले आणि ते १९०६ साली पूर्ण झाले. जेलच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर प्रथम दोन्ही बाजूला फोटो  गैंलरी आहेत. तिथे या जेलमध्ये शिक्षा भोगलेल्या देशभक्तांचे फोटो  माहिती मिळते तर डाव्या बाजूला भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान देणाऱ्या वीरांसाठी अखंड तेवत असणारी स्वातंत्र्य ज्योत आहे. नंतर मोकळे पटांगण आहे तिथे खुर्च्या मांडल्या होत्या कारण रोज संध्याकाळी जेलच्या आवारात “Light and sound” शो दाखवला जातो.

ही जेल इंग्रजांनी बांधली तेव्हा त्याची रचना “ऑक्टोपस” या समुद्र प्राण्यासारखा होती. “Central watch towar” आणि त्याला जोडल्या गेलेल्या सात तीन मजली इमारती ज्यामध्ये कैद्यांना एकांतवास देण्यासाठी बांधलेल्या कोठड्या. भारत स्वतंत्र झाल्यावर इंग्रजांनी चार इमारती नष्ट केल्याने आता तीनच इमारती अस्तिवात आहेत.  “Central towar” वरून तीनही इमारतीवर लक्ष ठेवता येइल तसेच वेळप्रसंगी तीनही बिल्डींग “Central towar”  पासून अलग करता येतील अशा पद्धतीने “Central towar’ चे बांधकाम आहे. त्यामुळे कमी रक्षकांनी ज्यास्तीत ज्यास्त कैद्यांवर लक्ष ठेवता येत असे. इंग्रजांनी या जेलवर Devid Bary या क्रूर कर्म्याला जेलर म्हणून नियुक्त केले होते, संपूर्ण जेलवर त्याची अनिर्बंध सत्ता होती. या जेल मध्ये एकंदर ६९४ कोठड्या आहेत. या कोठ्ड्यांची रचना कैद्याला निराश करणारी आहे. कोठडीची उंची १३.५० फुट तर एकंदर  वावरायला जागा ७० चौरस फुटाची. कोठडीच्या मागच्या भिंतीला उंचावर छोटा झरोका. पुढच्या बाजूला  लोखंडी मजबूत दरवाजा.कडी कुलूपाची सोय बाजूच्या भिंतीतील खास खोलगट भागात त्यामुळे कोणालाही आतून दरवाजा उघडता येणे शक्यच होणार नाही अशी रचना. सर्व कोठडीत जाण्यासाठी मार्ग “Central towar”  मधून होता. या जेलमधून सुटका करून घेणे अशक्य होते. एकदा कोठडीचे दार रात्री बंद झाले की सकाळपर्यंत उघडत नसे.कैद्यांना रात्री नैसर्गिक विधीसाठी पण बाहेर जाता येत नसे.कैद्यांना एकमेकांशी बोलायची मुभा नव्हती.आपल्या शेजारच्या कोठडीत कोणता कैदी आहे हे पण समजणे मुश्कील असे. याच कोठड्यांमध्ये तिसऱ्या मजल्यावर शेवटच्या कोठडीत सावरकर कोठडी आहे. या कोठडीत सावरकरांना १० वर्षे ठेवले होते. सावकरांच्या कोठडीच्या बरोबर समोर जेलच्या आवारात एक छोटी खोली दिसते तिथे कैद्यांना फाशी देण्याची व्यवस्था होती. या ठिकाणी अनेकांना फाशी दिले गेले  ते सर्व सावरकराना बघावे लागले. इंग्रजांना वाटत होते की या कारणाने सावरकर खचून जातील व शरण येतील पण हा पोलादी पुरुष शेवटपर्यंत इंग्रजांना शरण गेला नाही. जेलच्या आवारात मोकळ्या जागेत  एक “वर्क स्टेशन” आणि संग्रहालय आहे या मध्ये त्याकाळातील कैद्यांना कष्टाची कामे दिली जायची, शिक्षा दिल्या जात त्या संबधातील विविध वस्तू ठेवल्या गेल्या आहेत. तेव्हा कैद्यांना देण्यात येणारे कोलूचे काम व इतर कष्टाची कामे तसेच शिक्षेचे प्रकार याची माहिती या ठिकाणी मिळते.हे सर्व पाहून त्याकाळी शिक्षा भोगायला आलेल्या कैद्याची मनस्थिती कशी असू शकेल याची कल्पना येते. रात्री जेलच्या आवारात दाखवला जाणारा “Light and sound” शो बघितल्यावर अधिक माहिती समजली. स्वातंत्र्यवीर सावरकरां व्यतिरिक्त फजल-ए-हकखैराबादी, दीवान सिंह कालेपानी, योगेन्द्र शुक्ला, मौलाना अहमदुल्लाह, मोलवी अब्दुल रहीम सादिकपूरी, बटुकेश्वर दत्त, मौलवी लियाकत अली, बाबाराव सावरकर, भाई परमानंद, षडान चन्द्र चटर्जी, सोहन सिंह, वामन राव जोशी आणि नंद गोपाल आणि इतर अनेक जणानी या जेल मध्ये शिक्षा भोगली आहे. या जेल मध्ये कैद्यांना अमानुष अत्याचारांना, शिक्षाना सामोरे जावे लागे. ते ऐकून अंगावर काटा येतो.१९३३ साली या जेल मध्ये होत असणऱ्या अमानुष अत्याचारां विरुद्ध कैद्यांनी “भूक हरताळ” केला होता.या मधे महावीर सिंह या कैद्याचा मृत्यू जबरदस्तीने अन्न भरवल्यामुळे झाला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बाकीचे साथीदार यांनी भोगलेले कष्ट, त्यांची स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरु असलेली धडपड, कामावरील श्रद्धा, निस्सीम राष्ट्रभक्ती याच यथार्थ वर्णन show मध्ये ऐकता आलं. सकाळच्या वेळी गाईड समवेत जेलचा सर्व परिसर नीट न्याहाळला होता त्यामुळे लाईट शो मध्ये सर्व संदर्भ नीट लागत गेले. शो बघून आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच देशा साठी बलिदान देणाऱ्या तसेच कष्ट सहन करणारया वीरांच्या आठवणींनी मन अगदी हेलावून गेले. मला असे वाटते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर अनेक वीरांनी जे कष्ट भोगले, त्याग केला ते जाणण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी या सेल्युलर जेलला अवश्य भेट द्यावी…….

(लेखासाठी संबधित वेब साईट ची मदत झाली आहे).

— विलास गोरे

 

Avatar
About विलास गोरे 22 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

1 Comment on सेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..