नवीन लेखन...

चलनी नोटांची काळजी

काळा पैसा आणि चलनी नोटांमधील अफरातफरी रोखण्यासाठी भारत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या १००० आणि ५०० रूपयांच्या चलनी नोटा ३० डिसेंबर २०१६ नंतर बंद होणार आहेत. त्यामुळे आता १००० आणि ५०० रूपयांच्या जून्या नोटा यापूढे चलनात राहणार नाहीत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री हा निर्णय जाहीर केला. आता २००० आणि ५०० च्या नवीन नोटा बाजारात येणार आहेत.

आपले सरकार व्यवहारातील चलनाचा सांभाळ कसा चांगल्या रीतीने करत येईल याकडे लक्ष देत आहे. आपण रोजच्या जीवनात या चलनी नोटा कळत न कळत अयोग्य रीतीने हाताळत असतो याकडे आपले दुर्लक्ष होत आहे ह्याचे आपल्याला भान सुद्धा राहत नाही.

आपण आपल्या दागिन्यांचे, आरोग्याचे, मुलाबाळांचे संरक्षण करतो, त्याची देखभाल करतो त्याप्रमाणेच या चलनी नोटांचीही आपल्याला या देशाचे प्रामाणिक नागरिक म्हणून देखभाल कारणे अत्यंत गरजेचे आहे. पण तसे होताना दिसत नाही असे आपल्या चलनी नोटा बघितल्यावर लक्षात येते.

आपल्याकडून कळत न कळत नोटा कश्या हाताळल्या जातात ते बघू :-

  • बँका, पोष्ट ऑफिसेस, रेल्वे, बेस्ट बसेसचे काही कंडक्टर्स, सरकारी-निमसरकारी कार्यालये यांचे काही कर्मचारी व्यवहारातील पैश्यांची देवाण-घेवाण करताना, नोटा मोजताना बऱ्याच वेळा पाण्याऐवजी थुंकीचा उपयोग करताना दिसतात. परंतु आता ते बऱ्याच प्रमाणत कमी झाल्याचे दिसते.
  • बँकांच्या आणि आस्थापनांचे काही कॅशियर तर चक्क वेगवेगळया नोटा घेतल्यावर त्या स्वत:कडे असलेल्या नोटांत (उदा. हजार, पाचशे, शंभर, पन्नास, दहाच्या) मिसळण्या आगोदर त्यावर स्वत:जवळ असलेल्या नोटांवर आधीच्या नोटांचा आकडा खोडून किती नोटा जमा झाल्या आहेत ते समजण्यासाठी त्यावर नवीन आकडा लिहितात. समजा क्याशियरकडे ५०० च्या ७० नोटा होत्या आणि त्यात २० नोटा जमा झाल्या तर त्या आधी नोटांवर लिहिलेला आकडा खोडून ९० लिहितात आणि तेही बॉल पेनाने. कदाचित आता लिहिणार नाहीत अशी आशा करूया.
  • काहीवेळा असे दिसते की आपल्या देशाचे सुजाण नागरिक नोटांवर नावे, फोन नंबर, तर काही वेळा तर चक्क निरोप लिहिलेले असतात, तर काही वेळा बॉलपेन चालते का नाही हे बघण्यासाठी एखाद्या रफ पेपर सारखा नोटेचा उपयोग ही करण्यासाठी मागेपुढे बघत नाहीत हे खरोखर कुठेतरी थांबले पाहिजे. काही नागरिक नोटा निष्काळजीपणे हाताळतात. याला देशप्रेम नसल्याचे हे द्योतक म्हणावे का?
  • असे ऐकण्यात येते की काही विकसित राष्ट्रात तर हा गुन्हा मानून कायदेशीररीत्या दंड केला जातो. कित्येक वेळा चलनी नोटा इतक्या घडी घालून ठेवण्यात येतात की त्या पुन्हा वापरात आल्यावर खुपच खराब होतात. काही वेळा नोटांवर रंग लागलेले असतात, मळलेल्या असतात. आज आपला देश स्वतंत्र होऊन ६० वर्षापेक्षा जास्त वर्षे होण्यास आली तरीही नागरिकांच्या वृत्ती बदललेल्या नाहीत. गचाळ, आळशी, देशप्रेम नसल्याचे हे द्योतक आहे. यावरून आपल्या देशाची प्रतिमा इतरत्र पाहिली आणि बघितले जाते.
  • सध्या धनादेशावर (चेक) काही खाडाखोड झाल्यास तो वटला जात नाही म्हणजे त्याचे मूल्य आपल्या किंवा दुसऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत तसे काहीसे एखाद्या चलनी नोटेवर कोणी वरीलप्रमाणे काही लिहिले असेल, काही कारणांनी नोटेचा रंग बदलला असेल तर ती नोट व्यवहारातून बाद झाल्याचे समजावे. अश्या नोटा चलनातून बाद करण्यात याव्यात. नोटेचा कुठल्या दुसऱ्या कामासाठी दुरुपयोग केला गेला असेल तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतात हे देशातील नागरिकांना कळेल आणि चलनी नोटा कश्या जपाव्यात आणि वापराव्यात हे कळेल.

तरी सर्व सुजाण भारतीय नागरिकांस नम्रपणे असे सांगावेसे वाटते की देशातील कोणीही नागरिक चलनी नोटांचा वरील कारणांसाठी दुरुपयोग करताना आढळल्यास त्याला तेथेच अटकाव करावा की जेणेकरून आपण आपल्या चलनी नोटा सुंदर, सुरक्षित आणि  स्वच्छ ठेऊ.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..