‘अ ‘ ने खाल्ले अननस
‘आ ‘ पळाला आईकडे
‘ इ ‘ ने घातली इजार
‘ ई ‘ ने पाहिले ईडलिंबू
‘ उ ‘ ना माहिती उपमा
‘ ऊ ‘ ने खाल्ला ऊस
‘ ए ‘ तर एकलकोंडा
‘ ऐ ‘ ची वाढते ऐपत
‘ ॲ ‘ तर घेतो ॲक्शन
‘ ओ ‘ ची जुनीच ओळख
‘ ऑ ‘ सतत ऑनलाईन
‘ औ ‘ चे शेतात औत
‘ अं ‘ ने कापले अंतर
‘ अ: ‘ मिसळे अक्षरांत
चौदाखडीची गंमत भारी
मज लागे प्यारी प्यारी
विठ्ठल मारूती जाधव
शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५
Leave a Reply