बालसाहित्यकार आणि कोशकार अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ यांचा जन्म २५ जून १९१९ रोजी झाला.
अमरेंद्र गाडगीळ हे बालसाहित्यकार आणि कोशकार म्हणून ओळखले जातात. ते अखिल मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे संस्थापक होते. त्यांनी ‘गोकुळ’ या मुलांच्या मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिलं होतं. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे प्रखर देशभक्त होते. त्यांनी ‘वंदेमातरम्’ हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून अखेरपर्यंत नेटाने सांगीतिक लढा दिला. त्यामुळे तत्कालिन राजवटीला वंदे मातरम् पूर्णपणे डावलता आले नाही व त्यास राष्ट्रगीत नाही तरी निदान राष्ट्रीय गीताचा बहुमान द्यावा लागला हे सर्वश्रुत आहे. श्री. अमरेंद्र गाडगीळ यांनी ‘वंदे मातरम्’ हे वंदे मातरम् च्या इतिहासाबद्दल अतिशय माहितीपूर्ण पुस्तक लिहिले व स्वतःच्या गोकुळ प्रकाशनातर्फे प्रकाशित केले. तेव्हा मास्तर कृष्णरावांचा राष्ट्रगीताकरिताचा लढा स्मरून हे पुस्तक त्यांनी मास्तरांच्या चिरंजीवांना अतिशय प्रेमादराने भेट दिले. या सत्य घटनांवर आधारित पुस्तकाच्या रूपाने लेखक श्री.गाडगीळ देशप्रेमी वाचकांच्या चिरकाल स्मरणात राहतील.
१९७८ साली इचलकरंजीमध्ये भरलेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६७ साली गणेशचतुर्थीला अमरेंद्र गाडगीळ ह्यांनी कामास सुरुवात केली. १९६८ च्या गणेशचतुर्थीला पहिली आवृत्ती तयार होती. दुसरी आवृत्ती १९८१ मध्ये आली. तिसरी परिवर्धित आवृत्ती २००१ साली आली. त्यांनी दैवत कोशांची निर्मिती केली. जीवनसंग्राम, ताई अन् भाऊ, वटपत्र, राष्ट्रसेवकाची शिदोरी, राम बंधू त्याग सिंधू, उक्तीविशेष, साहित्य सरिता, अज्ञाताची वचने, वंदे मातरम, किशोर मित्रांनो, देवादिकांच्या गोष्टी, हनुमान कोश, श्रीराम कोश, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ यांचे ३ जानेवारी १९९४ रोजी निधन झाले.
Leave a Reply