किती सोसायचे
किती भोगायचे
दोन चिमुकल्या हातांसाठी जगायचे
बोबड्या बोलातल्या
जिव्हाळ्यात झुलायचे,
भाबड्या डोळ्यात त्या
हास्य फुलवायचे अन्
चिमण्या ओठांमधले
गीत होऊन गायचे
भरारणार्या पंखामधले
सामर्थ्य होऊन रहायचे
अंधारात मार्ग होऊन
ज्योतीपरी तेवायचे
जागेपणी उद्याचे
स्वप्नगंध हुंगायचे
अन् पुन्हा एकदा
एकटे एकटेच व्हायचे
ना कुणासाठी झुरायचे
ना कुणासाठी फुलायचे
फक्त …..
चिमण्या पिलासाठीच उरायचे
Leave a Reply