चिऊताई चिऊताई भिजतोय गं मी, दार उघड
तू नको माझ्या घरात,जा कुठेतरी दड
चिऊताई चिऊताई कुडकुडतोय गं मी, दार उघड
उठ जा इथून रे, मला नाही सवड
चिऊताई चिऊताई खिडकीचे तरी कवाड उघड
खिडकीतून येईल पाणी नकोचं ती धडपड
चिऊताई चिऊताई मनाचे तरी दार उघड
मला ऐकायचीचं नाही तुझी बडबड
चिऊताई चिऊताई मी गेलो, आता तरी डोळे उघड
येशील तुही कधीतरी बंद दारावर करीत धडधड
पापपुण्याच्या गाठोड्याची तुझी तूच केलीय बघ निवड
इथे प्रत्येकालाच प्रत्येकाची कधी न कधी पडते बघ नड!!
— वर्षा कदम.
Leave a Reply