पहिला चोर : काये रे, या विषाणूच्या संकटाने आपली तर पूरती उपासमार सुरु झाली आहे.
दुसरा चोर : या लॉकडाऊनमुळे सर्व मंडळी घरातच बसल्याने कोठेच हात मारता येत नाही.सगळी घरं माणसाने भरलली आहेत.पूरा लोचा झाला आहे, भाय.
पहिला : तसेच सगळीकडे दिवसरात्र जागता पाहारा आहे.तो चोरांसाठी नसून घरातून बाहेर फिरण्यास पडणा-यांसाठी आहे. आपल्या सारख्या लपत लपत फिरणा-यांना पकडत नाहीत तर खुल्लेआम फिरणा-यांना पोलीस पकडत आहेत.हे तर आपल्यासाठी बरं आहे.
दुसरा : सर्व सोसायटींचे गेट कायम बंद व गेटवर खडा पहारा असल्याने काहीच जमत नाही.
पहिला : भुरट्या चो-या केल्यातरी चोरीचा माल घेण्यारी दुकाने बंद आहे.सगळीच अडचण निर्माण झाली आहे.जमलेला सगळा पैसा संपला आहे.
दुसरा : रस्त्यावरील नवीन गाड्या चोरल्या व बाहेर रस्त्यावर काढल्या तर पोलीस जप्त करीत आहेत.
पहिला : सगळीच गोची झाली आहे.बाहेरही पडता येत नाही. दारु व गुटखा मिळत नाही.
दुसरा : टपरीपाठीमागे पत्ते खेळायला खिशात पैसाही उरला नाही.कोण उधार देत नाही.
पहिला : एक मात्र बरं, तोडांवर मास्क लावला की कोणीच ओळखत नाही.सामान्य नागरिकांसारखा मान मिळतो. पोलीसांसह कोणीच आपल्याकडे संशयाने पाहत नाहीत.
दुसरा : भाय, काही दिवसात आपल्यावर धाड देखील पडली नाही.पळायला न लागल्याने पाय दुखत आहेत. काही दिवस असच राहीलं तर चोरांची जमातच नष्ट होईल.
पहिला : एक भीती देखील वाटते जर आपल्याला विषाणूनी पकडले तर आपल्याला कोण पाहिलं का? आपल्याला कोण वाचवेलं का रे?
दुसरा : आपण चोर म्हणून प्रसिध्द असताना आपल्याबद्द्ल कोण बरं सहानुभूती दाखवेल? उपचार न मिळाल्याने मरुन जावे लागेल.
पहिला : काल एका सामजिक संघटनेच्या कार्यकर्त्यानी वडापाव व पाण्याची बाटली दिली. पण रोज असे मिळणार नाही म्हणून काळजी वाटते.
दुसरा : भाय, आपण आपल्या संघटनेच्या प्रमुखाला भेटून आपल्या व्यथा सांगून सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करायला सांगूया.
पहिला : आम्हां चोरांना सरकार कायद्याने काही मदत करु शकणार नसले तर आम्हाला पोलीसांच्या बरोबरीने पाहारा देण्यासाठी मदतीला द्द्या.या विभागातील सर्व माहीती आम्हाला असल्याने पोलीसांना त्याचा उपयोग होईल व आम्हाला थोडेतरी खायाला मिळेल.आम्ही ’तबलीघी जमात’च्या कार्यकर्त्यांना शोधण्यात देखील मदत करु.
दुसरा : आम्ही रुग्णालयादेखील रुग्णांची सेवा करायला तयार आहोत. आता उपासमारीने मरण्यापेक्षा कोणाची सेवा करुन मेलो तर केलेल्या पापातून मुक्ती तरी मिळेल, भाय
पहिला : अख्या आयुष्यात आपण फक्त चो-याच करीत जगलो.समाजाला लुटलं.पण सर्वांवर आलेल्या मोठ्या संकटात समाजासाठी कामे करण्याची संधी मिळाली तर आपल्यात सुधारणा होवून आपण एक सामान्य नागरीक बनू शकू.
— विवेक तवटे
कळवा,ठाणे.
Leave a Reply