नवीन लेखन...

क्लाउड कॉम्प्युटिंग

एखाद्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत प्रत्येक कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी हार्डवेअर (संगणक व यंत्रसामुग्री) व सॉफ्टवेअर (आज्ञावली) उपलब्ध करून द्यावी लागते. केवळ प्रत्येकाला संगणक देऊन भागणार नाही तर सॉफ्टवेअर लायसन्स घ्यावे लागेल. जर नवीन कर्मचारी भरती झाला तर पुन्हा त्याच्यासाठी सॉफ्टवेअर व हार्डवेअर घ्यावे लागेल. पण असे करत बसलात तर तुम्हाला फार त्रास होईल व पैसे किती खर्च होतील याची गणती नाही.

त्यामुळे प्रत्येक संगणकासाठी वेगळे सॉफ्टवेअर घेत बसण्यापेक्षा एकाच यंत्रणेद्वारे हे काम करता येते, त्यामुळे तुमच्या कंपनीतील सगळे कर्मचारी वेबवर आधारित सेवेच्या आधारे ‘लॉग इन’ करतील व हवे असलेले सगळे प्रोग्रॅम्स (आज्ञावली) वापरतील. दूरस्थ संगणकांच्या मदतीने ई-मेल पासून तर वर्डप्रोसेसिंगपर्यंत सगळ्या क्रिया विनासायास पार पडतील.

तर यात काय केले गेले; संगणकांचे जाळे वापरले गेले. हे संगणक कुठल्या देशातले आहेत, कुठे आहेत हे आपल्याला माहीत नसते, पण त्यांच्याच मदतीने आपण ई-मेल पाठवू शकतो. गुगल किंवा याहू मेल सर्च करू शकतो. या सगळ्या प्रक्रियेला क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणतात.

विजेची ग्रीड असते त्यातून सगळ्यांना वीज दिली जाते तसाच हा प्रकार आहे. म्हटलं तर ते आउटसोर्सिंग आहे, म्हटलं तर इंटरनेटवरची कॉम्प्युटिंग सेवा आहे.

स्थानिक संगणक सगळे काम करू शकत नाहीत. कारण संगणकावर अनेक उपयोजित आज्ञावली असतात, त्या वेगवेगळी कामे करत असतात. त्यामुळे संगणकांचे जाळे वापरले जाते. वापरकर्त्या कंपनीने क्लाऊड कॉम्प्युटिंग सिस्टीमचे इंटरफेस सॉफ्टवेअर घेतले की काम सोपे होते, ते वेब ब्राउजरसारखे सोपे असते. आपण रोज संगणकावर ई-मेल पद्धत वापरतो तेव्हा क्लाऊड कॉम्प्युटिंग वापरत असतो, आपल्या संगणकावर ई-मेल पाठवण्याचा प्रोग्राम नसताना आपण वेब ई-मेल अकाउंटवर लॉग इन करून बाहेरून ती सेवा घेत असतो. हा प्रोग्राम सेवा पुरवठा करणाऱ्याच्या कॉम्प्युटरवर असतो.

यात क्लाऊड हा शब्द कुठून आला असा प्रश्न पडला असेल तर, तो पूर्वीच्या टेलिफोन संदेशवहन प्रणालीतील शब्द आहे. त्यातही असेच एक संदेशवहन साधनांचे जाळे होते; त्याला व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणत असत. क्लाउड कॉम्प्युटिंग हा शब्द १९९७ मध्ये प्रथम रामनाथ चेलप्पा यांनी त्यांच्या एका भाषणात वापरला होता. १९६० मध्ये जॉन मॅकार्थी यांनी क्लाऊड कॉम्प्युटिंगची संकल्पना प्रथम मांडली. १९६६ मध्ये डग्लस पार्खिल यांनी त्यांच्या एका पुस्तकात क्लाउड कॉम्प्युटिंगच्या इतर उपयोगांचा ऊहापोह केला. अॅमॅझॉन, गुगल, आयबीएम अशा अनेक कंपन्यांनी या क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..