हा एक महत्त्वाचा व नेहमी आढळणारा मनगटाजवळील विकार आहे. या सांध्याच्या पुढील भागात रेडीयस आणि त्यापुढील कार्पल हाडाच्या सान्निध्यात निसर्गाने एक मोठा बोगदा तयार केलेला आहे. यातून मीडियन चेता आपल्या बाहुतून हातात प्रवेश करते. हिच्या बाजूने बोट हलविणारे अनेक कंडार (टेन्डन) ही जातात.
काही कारणाने या बोगद्याची खोली कमी झाली तर ही मीडियन चेता दाबली जाते व रुग्णाला अंगठा व तर्जनीमध्ये | मुंग्या येणे, दुखणे, तसेच स्पर्श न समजणे अशा तक्रारी सुरू होतात.
अधिक काळ गेल्यानंतर मीडियन चेता ज्या हाताच्या छोट्या छोट्या स्नायूंना प्रेरीत करते त्या स्नायूंना पक्षाघात होतो व ते स्नायू सुकतात. मग मात्र हातातील अंगठ्याजवळचा उंचवटा सपाट होतो. रुग्णांना अधिक त्रास होऊ लागतो.
बऱ्याच बायकांना गरोदरपणात किंवा मासिक पाळीच्या वेळी हातात अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवतात. याचे कारण कमी वेगात गेला तर मीडियन चेता दाबली गेली आहे असे निदान केले जाते.
उजव्या बाजूस तक्रार असेल तर डाव्या बाजूच्या चेतेचीही तपासणी करून तुलना केली जाते.
या इ.एम.जी. तपासाने हीच चेता मानेमध्ये दाबली गेली असेल तर त्याचेही निदान होऊ शकते.
सोनोग्राफी एम.आर.आय.स्कॅन तपासांनीही याचे निदान करता येते. अशा नवनवीन व उत्तमोत्तम तपासण्यांनी आजच्या डॉक्टरांचे निदान निश्चितीत पोहोचते.
डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply