सूर्य पूर्वेला उगवून पश्चिटमेला मावळतो. कारण, पृथ्वी पश्चिलमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे कालनिश्चि्तीसाठी पृथ्वीचे २४ उभे भाग करण्यात आले. त्याला आपण रेखांश असे म्हणतो. दोन रेखांशांमधील भाग म्हणजे एक टाईम झोन होय. प्रत्येक टाईम झोन ध्रुवापासून १५ अंशांच्या कोनात असतो. ब्रिटनमधील ग्रिनिच येथे शून्य रेखावृत्त असल्याने तेथील वेळ प्रमाण मानून त्या आधारावर पुढील टाईम झोन निश्चिनत करण्यात आले आहेत.
१३ ऑक्टोबर १८८४ रोजी लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
आकाराने मोठ्या असलेल्या, तसेच भिन्न वातावरण असलेल्या देशांमध्ये एकापेक्षा अधिक टाईम झोन करण्यात आले आहेत. फ्रान्स, अमेरिका, रशिया, अंटार्क्टिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, न्यूझीलंड, ब्राझील, मेक्सिको, इंडोनेशिया या देशांमध्ये एकाहून अधिक टाईम झोन आहेत.
सर्वाधिक १२ टाईम झोन फ्रान्समध्ये असून, इंडोनेशियात तीन टाईम झोन आहेत. याखेरीज स्पेन, पोर्तुगाल, कजाकिस्तान, मंगोलिया, चिली, कांगो, इक्वेडोर आदी देशांमध्येही एकाहून अधिक टाईम झोन निश्चिरत करण्यात आले आहेत. या देशांमधील फ्रान्स, न्यूझीलंड, डेन्मार्क, इंडोनेशिया आदी देश आकाराने भारतापेक्षाही लहान असून, तेथे एकाहून अधिक टाईम झोन आहेत. सूर्य उगवण्याच्या, मावळण्याच्या वेळांना अनुसरून ते करण्यात आले आहेत. याउलट भारतापेक्षा आकाराने खूप मोठ्या असलेल्या चीनमध्ये मात्र एकच टाईम झोन आहे. तेथेही एकाहून अधिक टाईम झोन असावेत, अशी मागणी होत आहे.
सध्या भारतीय प्रमाणवेळ ‘अधिक ५.३०’ अशी आहे. म्हणजेच, शून्य रेखांशावर ग्रिनिच येथे जेव्हा रात्रीचे बारा वाजतात, तेव्हा भारतात पहाटेचे ५.३० वाजलेले असतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
Leave a Reply