विरोधाभास !
वडाचे झाड कुठेही उगवते !
भ्रष्टाचाराचे झाड मनात उगवते,
वडाच्या वाढीला पाणी नाही लागत,
भ्रष्टाचाराच्या झाडाला पैशाचं पाणी लागत !
वडाचे झाड ‘खता’ विना बहरते,
भ्रष्टाचाराचे झाड ‘खंता’ खात फुलते !
वडाच्या झाडांची पाने जाड मोठी,
भ्रष्टाचाराच्या झाडाची पानेच खोटी !
वडाच्या पारंब्या जातात खोल खोल,
भ्रष्टाचार झाडाच्या पारंब्या तर त्याहून खोल !
वडाची फुले-फळे गोड किती छान,
भ्रष्टाचाराच्या झाडाची फुले-फळे कडूजहर घाण !
वडाचे झाड हवेतील प्रदूषण कमी करते,
भ्रष्टाचाराचे झाड मनातील प्रदुषण वाढविते !
वडाचे झाड मन प्रसन्न ठेवते,
भ्रष्टाचाराचे झाड मन अप्रसन्न करते !
वडाच्या झाडाचा घेर खूप मोठा,
भ्रष्टाचाराच्या झाडाचा मोजता येईना इतका मोठा !
वडाच्या सावलीत झोप छान लागते,
भ्रष्टाचार झाडाच्या सावलीत झोप कायमची जाते !
वडाचे सर्वांग औषधा उपयोगी,
भ्रष्टाचारच्या झाडाचे सर्वांग माणसा विष-प्रयोगी !
<जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply