वटसावित्री पौर्णिमा.. आम्हा बायकांचा अतिशय जिव्हाळ्याचा दिवस असतो वडाच्या पुजेची तयारी पारंपरिक पोषाख आणि श्रद्धेने भक्तीने अखंड सौ भाग्याचे लेण मिळावे म्हणून वडाला दान मागायचे असते गावी असतांना वडाच्या पुजेला जात होते पण नंतर मात्र घरीच वटवृक्षाच्या पुजेचे चित्र मिळायचे ते आणून एका खपटावर डकवून पुजा करते आहे आजही फक्त दोरा घेऊन फेरी मारता येत नाही म्हणून त्याचे सातपदरी फोटोतल्या वडाला चिटकवते पूर्वी सात प्रदक्षिणा घालायची आता नाही.
इतकी वर्षे पुजा करत आले आहे म्हणून मला वाटले की यासाठी काही तरी करायला हवे कल्पना सुचली लेकीच्या शाळेचे बांधकाम सुरू आहे पुढे मोठे मैदान आहे तिथे एक वडाचे झाड लावता येईल म्हणून एक वडाचे रोप तिला लावायला सांगितले आहे आणि त्याचे पैसे पाठवले आहेत. खर तर या झाडाची किंमत पैशात मोजता येत नाही आणि लेक ते झाड मोठे झाल्यावर गोलाकार पार बांधेल त्यामुळे मुलांची सोय होईल आणखीन काय काय होईल याचे चित्र रंगवले व त्यातून ही कविता केली याला अनेक वर्षे लागतील पण माझे स्वप्न पूर्ण होणार. माझ्या आयुष्यातली कर्म भूमी म्हणजे शाळा जिथे आरंभ केला तिथेच मन रमते म्हणून झाड शाळेतील मुलांना व इतर सर्वांना हा वड आधार देणार.
आधारवड
वटपौर्णिमेला लेकबाई देते ग तुला वटरोपाचे दान
शाळेच्या आवारात लावून तू दे त्याला मानाचे स्थान
झाडाच्या पारावरती बसून मुले सहभोजन करतील
ते पाहूनच माझा आत्मा सुखी व समाधानाने तृप्त होईल
तुझी लेक जावई कधी येतील तेंव्हा बसतील पारावर थोडा वेळ
उन सावलीच्या तुकड्यांची पांघरेन मायेने वाकळ
वटपौर्णिमेला येतील चार सुवासिनी येतील नटूनथटून पुजेसाठी
अखंड सौभाग्यवती आशीर्वाद त्यांना मी देईन त्या साठी
तुलाही रोज रोज मी पाहीन नजरेच्या मायेने डोक्यावरून हात फिरवीन
तुझ्या किर्तीची यशोगाथा ऐकून ही आई तुझी ग होइल धन्य धन्य
सुट्टीत तुझी नातवंड माझी पतवंड खासच येतील
मायेने कुशीत घेऊन मी पतवंडासह पारंब्यावर अंगाई गात झुलवील
धन्यवाद
— सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply