लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे,
आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे….१,
जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे
मरण नसता आपले हाती, जगणे हे आले…..२,
लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते
जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते…..३,
गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे
नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ….४,
असमान्य ते एकचि मिळता, उणीवतेची खंत कशी
दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती, वीज चमकते रात्री जशी….५
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply