गौरी, अभाव्या अहंकारा, अग्निज्वाला..
अनेकशस्त्रहस्ता ईतकी सामर्थ्यशाली असूनही दक्षाच्या अपमानामुळे यज्ञकुंडात समिधे सारखी जळत..राहीली.. उमा-पार्वती ..तीचा उद्वेग कवितेतून मांडायचा प्रयत्न मी केलाय .. मागच्या वर्षी केलेली कविता थोडी वाढवली आहे .. चंद्रचूडासाठी पुन्हा गौरी, अपर्णा
माहेश्वरी या रुपांत तीचं अवतरणं ज्ञात आहे….
दाक्षायणी
एका सामाईकतेच्या अंतरातलं
तुझं फितुर होणं मी समजू शकते
भोवळणाऱ्या माझ्या भावनांचं काय ..?
ऋतु पर्णांचा आवेग
एका शिथिलतेनं झोकावत येतोय
त्या संथलयींचे उःशाप ही नको झालेत..
उन्नयनाची माझी परीभाषा
तुझ्या अनोळखी प्रदेशाला भेदत गेली
तरी आंधळेपणाचा डाव मांडत गेलास
चांदणछायांची विभूती
बेमालूम उधळत राहीलास
एका परीहारातलं साधणं
मृगवेधातलं…
अपेक्षा
तुझ्या रुद्रावेगाच्या तांडवाचा
शैलजेच्या उत्तानतेच्या
प्रवाहाचा… लवलवत्या अग्निशिंखांच्या ग्रासांचा
मी अभाव्या , अपराजिता
फक्त आणि फक्त संवेदनाहीन… ओल्या वचनांची जाणीव
गोठवत ठेवली….
हीमवर्षावासारखी..
कधीतरी याच अग्नीशिखांनी
मुक्तता करावी
दाक्षायणीची…..
© लीना राजीव.
Leave a Reply