नवीन लेखन...

मुक-बधिर शाळा, अलिबाग

Deaf And Dumb School, Alibaug

कुठलीही सुंदर गोष्ट हृदयात साठवून तिचा अनुभव घेण्यासाठी ऐकण्याच्या शक्तीची खुप गरज असते. नुसतं पावसात भिजणं, आणि त्या पावसाचा आणि कडाडणार्‍या विजांचा आवाज शांतपणे ऐकत भिजणं यात खूप फरक असतो. आईची पाठीवर प्रेमाची थाप पडली तर आपल्याला बरं वाटतच, परंतु जोडीला तिचे प्रेमाने ओथंबलेले शब्द कानांवर पडले तर आपला आनंद अजून द्विगुणीत होतो. परंतु काही मुलांच्या जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर त्यांची ऐकण्याची नस बिघडल्यामुळे श्रवणर्‍हास होतो आणि त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला वावरणार्‍या व्यक्ती, किंवा घडणारे प्रसंग, घटना यांचे पुर्ण आकलन करण्यात त्यांना अनेक अडचणी येतात. या मुलांची विचार करण्याची क्षमता पण प्रचंड असुनसुध्दा केलेले विचार इतरांपुढे लिखाणातून अथवा संभाषणामधून व्यक्त करता न आल्यामुळे ही मुले निराश होतात. अलिबागमधील शासकीय मूक बधिर शाळेने अशाच काही दुदैवी मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. या शाळेचं वेगळेपण म्हणजे इथे प्राथमिक शिक्षणाव्यतिरिक्त इतर अनेक उपक्रम घेतले जातात आणि या होतकरू मुलांच्या व्यक्तीमत्वाला अनेक पैलु पाडण्याचे आणि या मुलांमधील दडलेले असामान्य कलागुण आणि कौशल्ये इतरांपुढे आणण्याचे मौलिक कार्य केले जाते. अतिशय मायाळू आणि दक्ष शिक्षक, या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व अद्ययावत सोयी सुविधा, या सोयी-सुविधांना व्यवस्थित सांभाळणारे तज्ञ, निवासीत मुलांसाठी करण्यात आलेली उत्तम राहण्याची व आहाराची व्यवस्था, पाठयपुस्तकांव्यतिरिक्त या मुलांना उपलब्ध करुन देण्यात आलेली अनेक करमणुकीची साधने जसे टी.व्ही, टेबल टेनिस, कॅरम, क्रिकेटचे साहित्य, प्रत्येक वर्गामध्ये केवळ आठ विद्यार्थी संख्या या गोष्टींमुळे ही शाळा रायगड जिल्हयामधील एक आदर्श शाळा ठरली आहे. केवळ १ ते थी या आठ वर्षांच्या कालावधीत या मुलांच्या व्यक्तिमत्व विकसनाकडे बारीक लक्ष तर दिलं जातचं या शिवाय या मुलांमधला आत्मविश्वास आणि संवेदनशीलतासुध्दा जागवली जाते. त्यांच्या चेहर्‍यावरचं हास्य अधिक फुलावं, त्यांच्या विचारांच्या कक्षा अधिक रुंद व्हाव्यात व त्यांच्या पतीभेला नवे पंख फुटावेत साठी इथे अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने रांगोळी, हस्तकला, भरतकाम, शिवणकाम, विणकाम, नृत्य इत्यादी स्पर्धचा सामावेश होतो. या स्पर्धांच्या माध्यमातून या मुलांना निखळ मनोरंजन तर मिळतचं परंतु त्यंाना आपली स्वप्ने, महत्वाकांक्षा, विचार आणि अपेक्षा इतरांपुढे मांडण्याची एक कलात्मक संधी प्राप्त होते. या शाळेने मध्यंतरी एक अतिशय अनोखा आणि रक्षाबंधन सोहळा साजरा केला. एस.टी.मधील अनेक कर्मचार्‍यांना या दिवशी सुट्टी नसल्यामुळे त्यांना आपल्या बहिणींना भेटता येत नाही, तर या शाळेतील बहुतांश मुली ह्या अतिशय गरिबीतून आल्यामुळे यांनाही त्यांच्या भावांकडे जाता येत नाही. यामुळे या दिवशी या शाळेतील सर्व मुलींनी एस.टी. कर्मचार्‍यांना राख्या बांधून त्यांची ओवाळणी केली, त्या कर्मचार्‍यांच्या डोळयात अक्षरशः पाणी तरळलं या मुलांच्या मनात आनंदाची आणि आशेची कारंजी उडत राहावीत यासाठी ही शाळा नेहमी प्रयत्नशील असते. यासाठी प्रत्येक मुलाचा वाढदिवस इथे अतिशय थाटामाटात साजरा केला जातो. चॉकलेट केकचे वाटपसुध्दा केले जाते. प्रत्येक सण मग ती होळी असो किंवा रंगपंचमीए गोपाळकाला असो किंवा दसरा, गुढी पाडवा असो किंवा नवरात्रीची देवी बसवणे असो, या शाळेत अगदी साग्रसंगीतपणे आणि सर्व परंपरांचं आणि रिवाजांच पालन करुन साजरा केला जातो.

या मुलांमध्ये उपजत काही कौशल्ये असतात, त्यांची भावनिक आणि शारीरिक वाढ अतिशय सामान्य असते, आणि सर्व कलांमध्ये कधी कधी ही मुले सामान्य मुलांपेक्षाही सरस ठरतात, कारण त्यांच्याकडे लक्षविचलितपणा अजिबात नसतो. त्यांची एकाग्रशक्ती आणि आपल्या सवंगडयांसाठी काहीही करण्याची तयारी अगदी वाखाणण्यासारखी असते. समाज या मुलांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातून अतिशय संवेदनशील आणि प्रगल्भ झालाय. म्हणूनच या शाळेला अनेक दानशूर व्यक्तींकडून आणि राजकीय वर्तुळांमधूनही सर्वतोपरी मदत केली जाते. मकरसंक्रांतीला अनेक लोक बाहेरून या शाळेत येतात आणि मुलांना तिळगुळ देतात, त्यांच्याशी समरस होवून त्यांच्याप्रमाणेच खेळकर आणि निरागस बनतात. अगदी महाराष्ट्र माझाची निवेदीका करिता राहाणे हिनेसुध्दा या शाळेला उत्साही भेट दिली. त्यावेळी या सर्वच मुलांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. या शाळेतील शिक्षक या मुलांना अगदी योग्य प्रकारे आणि थंड डोक्याने हाताळू शकतात. कारण त्यांना त्यांच्या प्रशिक्षणात मानसशास्त्राची विशेष माहिती दिली गेली असते. यामुळे ते या मुलांचे हावभाव पाहून त्यांच्या गरजा ओळखू शकतात, त्यांची सुख दुख समजावून घेऊ शकतात, त्यांच्या पाठीवरून त्यांना हवा तेव्हा हात फिरवू शकतात, आणि केवळ त्यांच्या नजरेवरून त्यांच्या मनात काय चाललयं याबद्दल काही तर्क करू शकतात.

— अनिकेत जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..