देशासाठी वीरमरण ते,
भाग्यवान” किती तुम्ही,
कितीदा मागावे मरण असे, मिळत नाही “जन्मोजन्मी,” –!!!
भारत मातेची सेवा” करता,
देह तुम्ही हो ठेवला, —
देशसेवा करता करता,
पाईकांनी कसा बळी दिला,–!!!
अगदी पुण्यकर्म हे ठरे,
असा मृत्यू तुमच्या नशिबी,
नेताना तुम्हाला तोही घाबरे,
पडलात ना देशाकारणी,–!!!
ज्या मातीत खेळलो,वाढलो,
तिचे केले रक्षण तुम्ही,–
आईला पूजताना शेवट,
कुडी झाली निव्वळ माती,–!!!
घरदार– आईबाप,
पडतील उघड्यावरी,
विचाराने नाही छळले,–
इतकी तुमची होती तयारी,–!!!
शूरवीर देशाचे सैनिक,
खरेच तुम्ही धाडसी, –!!!
निधड्या छातीने सिंहागत,
शत्रूला झेलता अंगावरी,–!!!
हिमगौरी कर्वे
Leave a Reply