ध्यान कसे लावावे, मार्ग असे मनोहर,
सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार ।।१।।
स्वच्छ एक आसन, शांत जागी असावे,
मांडी त्यावर घालून, स्थिर ते बसावे ।।२।।
लक्ष्य केंद्रीत करा, तुमच्या श्वासावरी,
कसा फिरे वारा, आत आणि बाहेरी ।।३।।
साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत,
शांत करील मना, बघून प्राण ज्योत ।।४।।
काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान,
करण्यास तुम्ही जावे, जाईल सारे बिघडून ।।५।।
ध्यानात झोपे शरीर, शांत करूनी मन,
आंत शोधते ईश्वर, करूनी आत्मचिंतन ।।६।।
वेळ थोडा जाता, ध्यान सहज लागते,
अंतरीचा प्रकाश दिसता, मन आनंदात डुबते ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply