दिग्दर्शक निशिकांत कामत यांचा जन्म १७ जून १९७० मुंबई येथे झाला.
निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव होते.
रुईया कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. निशिकांत कामत यांनी २००४ मध्ये सातच्या आत घरात सिनेमातून लेखक आणि अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्याच वर्षी निशिकांत कामत यांनी ‘डोंबिवली फास्ट’या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.
त्यानंतर त्यांनी आर. माधवन सह या सिनेमाचा तामिळमध्ये रिमेक केला. निशिकांत कामत यांनी ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’ यासारख्या एकापेक्षा हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. याशिवाय ‘सातच्या आत घरात’,‘रॉकी हॅण्डसम’, ‘ज्युली 2’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’, फुगे, ‘डॅडी’ सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात अभिनयही केला. अजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्याने दिग्दर्शन थांबवून केवळ अभिनेता म्हणूनच काम केलं.भावेश जोशी सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यासोबतच रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. ‘दरबदर’ या आगामी सिनेमाचे तो दिग्दर्शन करणार होते.
प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे १७ ऑगस्ट २०२० रोजी निधन झालं.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply