जमीन खोदतां पाणी लागते,
हीच किमया निसर्गाची,
कमी अधिक त्या खोलवरती,
साठवण असे जलाशयाची ।।१।।
प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी,
समानता तो दाखवितो,
अज्ञानाचा थर सांचवूनी,
आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।।
एक किरण तो पूरे जाहला,
अंधकार तो नष्ट करण्या,
ज्ञान किरण तो चमकूनी जातां, फुलून येते ज्ञान वाहण्या…..३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply