ह्रदयद्रावक प्रसंग आला द्रौपदीवरी
विटंबना करुं लागले कौरव जमुनी सारी ।।१।।
द्युतामध्यें हरले होते पांडव बंधू सारे
द्रौपदीस लावले पणाला जेव्हां कांहीं न उरे ।।२।।
वस्त्रहरण करीत होता दुष्ट तो दुर्योधन
हताश झाले होते पांडव हे सारे बघून ।।३।।
‘ द्वारकेच्या कृष्णा ‘ धावूनी ये मी दुःखत पडे
मदतीचा केला धांवा कृष्ण बंधूकडे ।।४।।
धावूनी आला कृष्ण द्रौपदीचे मदतीसाठी
लाज राखली द्रपदीची उभे राहूनी पाठीं ।।५।।
कां उशीर केलास मदत देण्या मजला
लटका राग दाखवूनी प्रेमानें जबाब विचारला ।।६।।
बसलो होतो ‘तुझ्याच ह्रदयी ‘ अति जवळ
संबोधितां तूं ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘ येण्या झाला वेळ ।।७।।
म्हटले असते ‘ ह्रदयातील कृष्णा ‘ ये धावूनी लवकर
येथेंच होतो मी मदत केली असती सत्वर ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply