कोजागिरीची पौर्णिमा परि, आकाश होते ढगाळलेले
शोधूं लागले नयन आमचे, चंद्र चांदणे कोठे लपले
गाणी गावून नाचत होती, गच्चीवरली मंडळी सारी
आनंदाची नशा चढून मग, तल्लीन झाली आपल्याच परी
मध्यरात्र ती होवून गेली, चंद्र न दिसे अजूनी कुणा,
वायु नव्हता फिरत नभी तो, मेघ राहती त्याच ठिकाणा
दूध आटवूनी प्रसाद घेण्या, उत्सुक होतो आम्ही सारे
ढगात लपल्या चंद्राला मग, क्षीरात शोधी आमची नजरे
स्वादिष्ट मधूर दुग्धांमृत ते, शशिधरांच्या चांदण्यापरि
मेघांमध्ये तो लपला नसूनी, उतरलां होता ह्याच क्षिरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply