अगदी वर्षाच्या आतील नातीसह अनेक फोटो पाहून वाटले की नातीचे निरागस. आणि आज्जीचे निरपेक्ष प्रेम किती छान वाटले बघून. चिंगी महिन्याची झाली नाही तोच आठवते का ती नाट्यछटा. नातवंड घरी येण्याची चाहूल लागताच घरातील विषेश करुन आज्जीचे चित्त थाऱ्यावर रहात नाही. आपल्या मुलांना जे काही देता आले नाही ते अगदी व्याजासकट देण्याची धडपड सुरू असते. पण लेकी कडचे नातवंड काही दिवस असतात म्हणुन फार काही करता येत नाही पण मुलाकडचे कायम सहवासात असते. त्यामुळे अगदी न्हाऊ माखू घालणे ते मोठे होई पर्यंत. कटु सत्य आहे पण खर आहे ते मी पाहिलेले एक कटू सत्य….
माझी मोठी बहिण होती असे समजू या. तिला तीन मुल म्हणजे दोन मुली व एक मुलगा. तिला नात झाली होती म्हणून ती तिचे खूप कोडकौतुक. लाड करायची. मेहुणे व ती बि पी व शुगर पेंशट. मुलगा सून नोकरी करत तीन महिन्याची नात. आजारपण. घरकाम स्वयंपाक अगदी दमछाक होत असे. नात मोठी मोठी होत गेली तसे काम वाढत गेले. मग बालवाडी ते पुढे अनेक वर्षे तिचे आवरणे, शाळेत नेणे आणणे. खाणे पिणे. आवरणे. अभ्यास या शिवाय सुट्टीत तिच्या बरोबर भातुकली. फुगडी. झिम्मा. लंपडाव. गोष्टी सांगणे. आजरपण. रुसवा फुगवा सगळे अगदी सगळेच ती करायची.नवऱ्याचा तापट स्वभाव आणि कडक शिस्त पार अर्धी झाली होती. वय वाढत गेल तस नात शहाणी झाली. करुन घेणे जमत गेले. म्हणून आता आज्जीचे बोलणे. सल्ला जुमेनाशी झाली. शाळा. अभ्यास अशी कारणे देत आईबाबांच्या सोबत जास्त राहूलागली. शॉपिंग. बाहेरचे खाणे वगैरे गोष्टी आल्या समजू लागल्या. मन खिन्न झाले होते तिचे. मेहुणे सांगत होते की जास्त गुंतून जायचे नाही पण वेडी आज्जीची वेडी माया. आता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. पुढे कुठे शिक्षण घ्यावे याची चर्चा सुरू झाली होती. आणि एक दिवस अचानक सगळे बाहेर गेले ते संध्याकाळीच परतले. आणि कॉलेजात प्रवेश घेतला होता पण घरात कुणाला काही विचारले नाही की सगळे बसून चर्चा केली नाही याचा आज्जी म्हणून तिला मानसिक त्रास झाला व धक्का बसला होता. अस्वस्थ झाली. आणि आजार वाढला. वरून मेहुणे खूप बोलले…
तसेही आता या पिढीला माया प्रेम कमीच आहे. व्यवहारी जगात कसे जगायचे हे जाणतात भावनेत गुंतून पडत नाहीत. याची मनाची तयारी हवी. पूर्वीचा काळ गेला आहे. त्यामुळे थोडी कणखरता ठेवून जगता आले पाहिजे. कदाचित तुम्हाला पटणार नाही पण हे कटू सत्य आहे हे मात्र खरं आहे.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply