नवीन लेखन...

एक अयशस्वी आत्महत्या

इतरांप्रमाणे माझ्या मनात एक दिवस आत्महत्येचा विचार आला.आत्महत्येचा कोणता प्रकार निवडावा या विवंचनेत मी होतो.आत्महत्येची तीव्रता कमी होण्या अगोदर निर्णय होणे आवश्यक होते. नसता विचार बदलू शकतो.तीव्रता हेच यशाचे गमक आहे हा सुविचार देखील या निमित्ताने जन्माला आला.

विविध प्रकार चोखळल्यानंतर,’विहिरीत उडी मारणे’ हा सोपा प्रकार निवडला कारण खेड्यात बहुतेक आत्महत्या विहिरीत उडी मारुनच होतात, रेल्वे पटरी जवळपास नसल्याने विहीर हाच एकमेव पर्याय होता.

गावातल्या, गावाजवळच्या विहिरी विषयी माझे ज्ञान भरपूर होते. आत्महत्येसाठी प्रसिद्ध विहीरही मला माहित होती.परंतु त्या विहिरीत नाही तर नवीन विहिरीत आत्महत्या करायची असे मी ठरवले.

विहिरीत आत्महत्याकरण्याचे मी यामुळे ठरवले की कुणीतरी आपणास बघते ,आरडाओरड करते लोक जमतात ,आपणास बाहेर काढतात ,आपण वाचतो आणि आपले इच्छितही साध्य होते.

‘शोले’ मध्ये धर्मेंद्र जसा पाण्याच्या टाकीवर चढतो. लोक जमतात, आपण वाचतो. धमकीने इच्छित साध्य होते. हा गांधीवाद आहे.

अनेक विहिरी सुसाईड पाईंट असतात. नकळत पडूनही मरतात. मी अगोदर सर्व विहिरींचा आढावा घेतला. या प्रकारात कुठलेही साहित्य वापरावे लागत नाही. फक्त उडी टाकायची. जन्माला येण्याइतके मरण सोपे नसते. जन्मावर बंधन नाही, मरणावर आहे. माणसे मारली जातात पण मरु दिल्या जात नाहीत.

मी प्रथम गावच्या मधोमध असलेला बारव निवडला. तिथे वर्दळ असते. लोक लवकर जमतात, चर्चा होते. न मरता प्रसिद्ध होता येते. आमरण उपोषण सारखे!

मी सर्व कामे आटोपून आत्महत्यास्थळी गेलो.बारव जास्त खोल नव्हता .आजूबाजूला बघितले,उडी मारली. पण बघतो तर मी जिवंत! गुडघ्याभर पाणी होते. नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय मी मरणार नव्हतो.बारवला पायऱ्या होत्या. लोक जमले, गुपचूप वर आलो. ती आत्महत्या होती कुणालाच वाटले नाही, निराश झालो. पुन्हा विहीर शोधू लागलो.

एके ठिकाणी एक अरुंद विहीर होती.टाकली उडी.मध्येच अडकलो.आडवा झालो.जागचा हलेना. विहीर मालक आला.त्याने मला बाहेर काढून बदडले. म्हणाला,’मोठ्या कष्टाने मी विहीर खोदली आणि तु त्यात आडवा होतो!’ तिथेही निराश झालो.

एका ठिकाणी विहीर दिसली,टाकली उडी. पाण्याचा थेंब नाही,खोली नाही. पायाला मार लागला. तिथे वर यायला रस्सी होती, वर चढलो, लंगडू लागलो.

यश येत नव्हते. पुन्हा प्रयत्न. एक भली मोठी विहीर, तुडुंब पाणी. टाकली उडी.बघतो काय, त्या विहिरीत गावातली माणसे पोहत होती. एक मित्र होता. मला पोहता येत नाही त्यास ठाऊक होते. त्याने मला पाण्याबाहेर काढले, तिथेही अपयश!

मी प्रयत्न सोडणार नव्हतो, इतरांप्रमाणेच. आता गावाबाहेरच्या विहिरीत उडी मारायची असे ठरवले. एका शेतात गेलो. विहिरीत डोकावले, खुप खोल होती. आजूबाजूला कुणीच नव्हते. खरेच मेलो तर ही भिती होती. डोकावले तर एक साप दिसला. मी घाबरलो. घराकडे पळत सुटलो. जगण्याची भिती वाटते तशी मरण्याचीही वाटते .आपण ठरवायचे कोणती निवडायची!

— ना. रा. खराद.

8805871976

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..