मी कशी दिसते
एकदम आयटम ..
जाम वैतागली.
तिला काय अपेक्षित होते ते माहित नाही
पण मी बोलून गेलो.
मला माझीच मजा वाटली
कारण हे उत्तर मी कसे दिले .
पलोकांच्या नजरेत
सभ्य दिसणारा मी ..
तशी आमची ओळख जुनीच…
असे उत्तर दिल्यावर
अनेक माना गर्रकन फिरल्या.
खरेच ती तशीच दिसत होती लग्न झालेले असले तरी.
आता ती वैतागली का सुखावली हे मला नीट समजले नाही.
रात्री तिचा फोन आला
काय रे काही बड्बडलास ,
मला काही नाही वाटले .
मी काय टिपिकल बायको नाही.
माझा नवरा पण टिपिकल नाही.
पण तुझ्या तोडून हे ऐकले आश्चर्य वाटले
आणि बरेही वाटले.
आता ह्या पागल बाईला की मुलीला काय म्हणावयाचे.
काहीच कळले नाही,
उद्या काय करतोस भेटायचे आहे
बोलवायचेआहे .
बहुतेक हा आयटम शब्दाचा परिणाम असणार असे वाटले.
चल भेट उद्या , पण तुझा नवरा
तो नाही तीन दिवस बाहेर आहे.
मुले आता मोठी आहेत बऱ्यापैकी.
आज ती भेटली
एकदम सॉलिड दिसत होती.
ती गाडी पार्क करून समोरून येत होती.
सगळ्या नजरा तिच्याकडेच होत्या.
आम्ही हॉटेलमध्ये गेलो
नेहमीचे काय ते मागवले .
घुटके घेत होतो,
म्हणाली साला बोअर झाले ,
थ्रिल्लिंग काहीच घडत नाही
तू तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यात आलीस
किती मोठे थ्रिल आहे…तुझ्या नवऱ्याला …मी म्हणालो
जाऊ दे रे , हल्ली करमत नाही.
काय मोनो आला का..
जाम वैतागली.
तसे नाही. मला वाटते माझा नवरा डेटींग करतोय कुठेतरी.
सॉलिड काळजी घेतो ,कुठे आहेस ,
काय करतेस. जेव्हा नवरा जास्त काळजी घ्यायला
लागला तर समजावे सॉलिड काही तरी आहे.
आयला हिला काय बोलणार दरोरोज पुरणपोळी खाऊन वैतागणार ना तो
कुठेतरी भाकरीचा तुकडा आणि ठेचा खावासा वाटणारच ना.
मी आपले मनातले बोललो कारण
मी पोळी – भाजीवाला.
सलग तीन दिवस भेटत होतो.
लॉग ड्राईव्ह ला जात होतो.
अचानक तिने हात पकडला.
हे काय नवीन , नवीन ..
यस तुला आणि मला…
मी हात सोडवून घेतला नाही ..
साला सोडवावासा वाटला नाही.
ती जवळ आली…गाडी बाजूला उभी होती.
मी म्हणालो लिपस्टिक..
नाही ती पुसली जात नाही..
तरीपण समोरच्या टिशू पेपरला पुसली ..
दोन्ही सीट्स मागे घेतल्या ..पार मागे…
मनात विचार आला आयला आयटम शब्द काय बोललो…
स्फोट झालाच…!!!!
सतीश चाफेकर
Leave a Reply