बऱ्याच घरामध्ये पुर्वीपार पासून आठ दिवसातून एकदा पोट साफ करायला एरंड तेल घेण्याची प्रथाच आहे जणू.चला तर आज आपण ह्या एरंडाची थोडक्यात ओळख करून घेउयात.
ह्याचे २-६ मीटर उंचीचे गुल्म असते,पाने रूंद व खंडीत कडा युक्त असून हाताच्या बोटां प्रमाणे हे पान भासते.ह्याला येणारी फुले एकलिंगी असतात.तर फळ कच्चे असताना हिरवे मऊ व काटे असलेले असते.ह्यात दोन कप्पे असतात.ह्याचे बी द्विदल असते.तर मुळ वरच्या भागात जाड व टोकाला निमुळती होत जाते.
ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,बीज,तेल व मुळ.ह्याची चव गोड,कडू,तिखट असून हे उष्ण गुणाचे असते.तसेच हे स्निग्ध,तीक्ष्ण,सुक्ष्म,जड असते.एरंड वातकफनाशक आहे.
आता आपण ह्याचे उपयोग पाहू:
१)सुज आलेल्या भागावर एरंडाची पाने गरम करून बांधतात.
२)पोटदुखीत एरंड मुळाचा काढा हिंग व सैंधव घालून देतात.
३)आमवातामध्ये एरंड तेल सुंठीच्या काढ्यासोबत देतात.
४)बाळंतीणीस अंगावर दुध सुटायला एरंड तेलाचा अभ्यंग करतात.
५)पोट फुगले असल्यास एरंडाची पाने व बियांची चटणी गरम करून पोटावर बांधतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply