*कझाकस्तान, रशिया, बाल्टिक मधील तीन देश जसे की इस्टोनिया, लातविया, लिथुआनिया आणि युक्रेन*
सोवियत संघराज्याचा अस्त झाला आणि रशिया व इतर 15 कॉमनवेल्थ देश (CIS) तयार झाले. ह्या विभाजनासोबतच सोवियत संघराज्याच्या कडू आणि गोड आठवणींचा ठसा ह्या देशांना मिळाला. प्रत्येक सी.आय.एस देशाला आपली स्वत:ची अशी एक वेगळी भाषा व संस्कृती आहे आणि या आधारे हे देश वेगळे करण्यात आले.
सध्या पश्चिम रशिया हा युरोपमध्ये गणला जातो आणि बाल्टिक देश हे युरोपमधील शेंगेन देशांमध्ये गणले जातात, तसेच युक्रेन हा युरोपला खूपच जवळचा आहे. अशाच वेगवेगळ्या ऐतिहासिक, राजकीय, भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाच्या रशिया आणि इतर ५ देशांची सफर आम्ही आयोजली आहे.
कझाकस्तान, रशिया, बाल्टिक मधील तीन देश जसे की इस्टोनिया, लातविया आणि लिथुआनिया किंवा युक्रेन अशा वेगवेगळ्या सी.आय.एस देशांना भेट देणार आहोत. सोव्हिएत काळात रशियन भाषेची सक्ती व कम्युनिजम यामुळे या देशांना पूर्वी रशियाने जखडून ठेवले होते. सोव्हिएत काळानंतर या सर्व देशांनी कात टाकून आपले स्वत:चे वेगळेपण जगासमोर आणले. ह्या वेगवेगळ्या देशांची संस्कृती व पूर्वीची असलेली सोव्हिएत छाप आपणास अजूनही येथे पहावयास मिळते.
ह्या ऐतिहासिक पण निसर्गरम्य सहलीची सुरुवात आपण अल्माटी म्हणजेच काझाकस्तान पासून करतो. सुंदर बर्फाळ डोंगरांनी वेढलेलं अल्माटी शहर पाहून आपण थक्क होतो. अल्माटीला दोन दिवस थांबून पुढे आपण रशियाची राजधानी मॉस्कोला विमानाने प्रस्थाण करतो. मॉस्को पाहताना रशिया हि एके काळी महासत्ता होती याची प्रचिती आपल्याला येते. बाल्टिक समुद्राला लागून व रशियाच्या पश्चिमेला असे ३ देश असून, या देशांना ’बाल्टिक रिजन’ असे म्हणतात. एस्टोनिया, लाटविया, आणि एस्टोनिया असे बाल्टिक रिजन देश रशिया टूर बरोबर अनुभवता येऊ शकतात.
क्लासिकल ७ दिवस रशिया नंतर जवळील सुंदर’ ३ बाल्टिक देश हे आपल्यासाठी एक वेगळा अनुभव होऊ शकतो. हि बाल्टिक टूर आपण सहसा रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग टूर संपल्यावर इस्टोनियाची राजधानी टॅल्लीन पासून सुरु करतो. पाहताक्षणी प्रेमात पडावे असे हे छोटे शहर ही इस्टोनिया देशाची राजधानी व हेलाईंकी पासून खूप जवळ असलेले एका बंदर आहे. मध्ययुगीन काळात निर्माण झालेल्या या शहराने आपल्या जुन्या इमारती आणि मॉन्युमेंट त्यांच रंग-रुप अजूनही बऱ्याच अक्रमाणांनतही जपले आहे. येथील तल्लीन ओल्ड टाऊन, किंवा रशियन कॅड्रीओग पॅलेस, अशी तल्लीन वॉकिंग टूर करताना खूप मजा येते. टॅल्लीनंतर आपण रीगा शहराकडे प्रस्थान करताना पारनाऊ ह्या बीचला व्हिजीट करतो. शुभ्र वाळू असलेल्या लांब बाल्टिक समुद्र किना-यासाठी पारनाऊ प्रसिध्द आहे. येथे थोडा वेळ भेट लंच घेतल्या २०० कि.मीचा प्रवास करुन लातवियाची राजधानी रिगाला आपण पोहचतो. रिगामध्ये सोव्हिएत साम्राज्यच्या अजूनही काही खुणा आपल्याला दिसुन येतात. रिगामध्ये सुद्धा सुदंर असे टिपिकल युरोपियन ओल्ड टाऊन आहे. ओल्ड टाऊन रिंगा हे पॉप्युलर एटरटेन्मेंट डिस्ट्रीक आहे.
रिगामधील सर्वाची आवड्ती अस्बर्ट स्ट्रीटवर आर्ट-नेविआऊ अशी एक स्पेशल आर्किटेक्चरल बिल्डिगस फ़ेमस आहेत.
रीगा सफ़र पूर्ण केल्यानंतर आपण पुढे विलनस जायला निघतो. या प्रवासात लतविआतील ’लिटिल व्हसाईल ऑफ़ बाल्टिक’ म्हणून प्रसिध्द असलेल्या रुंदाले पॅलेस रशियन राजवटीत पीटर राजाने बांधलेला आहे आणि ’हिल ऑफ़ क्रॉसेस’ या अनोख्या ठिकाणाला भेट देतो.
विल्नस सिटी टूरमध्ये विलनस युनिव्हर्सिटी, द प्रेसिडेन्ट पॅलेस, इत्यादी स्थलदर्शन करतो. विल्नस सिटीपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेला “ट्रकाय” कॅसल हा एका तळ्यामध्ये असलेला अवर्णनीय असा किल्ला आहे. लेकमध्ये उभा असलेला अतिशय देखणा कॅसल पर्यटकांना भुरळ घालतो.
जरी बाल्टिक देश खूप जवळ असले तरी ते पाहिल्यावर प्रत्येक देश हा वेगळा भासतो. येथील स्वस्त शॉपिग, बाझार, जेवण, भाषा, संस्कृती पर्यट्कांना आकर्षित करते.
चला तर मग क्लासिकल रशिया व बाल्टिक युरोपला.
अधिक माहिती साठी संपर्क साधा – एक्सकरशिया टूर्स (Excursia Tours): +919890004007, +919890157300