आज रात्रीचा मुक्काम झुगच्या त्याच हॉटेलमधे होणार होता. तासभराच्या प्रवासानंतर एंजेलबर्गपासुनच योगेशनी माउंट टिटलिसच्या मायनस डिग्री तापमानाची कल्पना दिली आणि थर्मलवेअर, वुलन जँकेट, स्वेटर्स, टोप्यांची वारंवार आठवण करत सर्व लेव्हल्स आणि लंच कुपन्स्ची व्यवस्थित कल्पना दिली. एंजेलबर्गपासुन टिटलिसच्या टिकेटिंगपर्यंतचा निसर्ग कायमचा डोळ्यात साठवावासा वाटला. असा निसर्ग अजुन कुठे असेल अस वाटत नाही.
केबल कारनी फर्स्ट लेव्हल स्कीप करुन डायरेक्ट मुव्हेनपिक आइस्क्रीम खायला गेलो. नंतर ग्लेसियर क्लेव्हमधे गेलो आणि जेमतेम दहा मीटर आत जाताच बाहेरच्या वादळाचा इशारा देत दोन स्वीस व्हॉलेंटियर्सनी आम्हाला ताबडतोब केव्हमधुन बाहेर काढल आणि मोठ्ठ संकट टळल. नंतर पाचव्या लेव्हलवर आम्ही बर्फाच्छादित टिटलिसचा थोडा वेळ आनंद घेतला. खराब हवामानामुळे फ्लायर राईड मात्र नाही होउ शकली. पण त्याला इलाज नव्हता. या नंतर अतिशय सुंदर, पावभाजी, गाजर हलवा, ढोकळा वगैरे जेवण करुन आम्ही ल्युसर्नकडे मार्गस्थ झालो.
ल्युसर्नला लायन मॉन्युमेंट पाह्यला आणि त्याच भागात बुखरर आणि कासाग्रँडे या भव्य दालनांमधे मनमुराद (विंडो) शॉपिंग केले. काहींनी स्विसमेक घड्याळ आणि देण्याघेण्यातली सॉव्हेनीर्सही घेतली. या नंतर ल्युसर्नची बोट राईड, वाईन, स्विस फोक म्युझिक आणि डिनर असा दीड तासाचा मौज मस्तीचा कार्यक्रम पार पडला. धमाल आली. #वीणा वल्ड# च संघटन कौशल्य या कार्यक्रमात दिसुन आल. सर्व अबालवृध्द मनमोकळेपणे नाचले, बागडले.
प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply