गुरूदत्त यांचे यांचे काही क्लासिक चित्रपट अगदी नक्की बघावे असे
साल १९६२
साहिब बीवी और गुलघा
निर्माता – गुरूदत्त
दिग्दर्शक – अब्रार अल्वी
कलाकार – मीना कुमारी, गुरूदत्त, रहमान, सप्रू, धुमाळ, नजीर हुसैन, एस्.एन.बॅनर्जी, कृष्ण धवन, जवाहर कौल, बिक्रम कपूर.
कथानक सारांश – नोकरीच्या शोधात कलकत्त्यात आलेल्या भूतनाथ या मध्यमवर्गीय परंतू सुशिक्षित तरूणाच्या नजरेतून सांगितलेली एका पतनोन्मुख जमीनदार घराण्याची १९ व्या शतकातील कथा. जमीनदाराची पत्नी छोटी बहू हिच्याबद्दल त्याला सुप्त आकर्षण वाटते. तिचा नवरा मात्र मद्य आणि मर्तिका यांच्यात रमलेला असतो. जमीनदार घराण्याचे पतन सुरू होते व छोटी बहू दारूच्या आहारी जाते. जमीनदारांच्या पतनाची कथा सांगणारा चित्रपट.
(विमल मित्र यांच्या कादंबरीवर आधारीत)
साल १९५९
कागज के फूल
निर्माता – गुरूदत्त
संगीत – एस.डी.बर्मन
दिग्दर्शक – गुरूदत्त
कलाकार – गुरूदत्त, वहिदा रहमान, जॉनी वॉकर, बेबी नाझ, महेश कौल, वीना, मीनू मुमताज.
कथानक सारांश – एका चित्रपट दिग्दर्शकाच्या शोकांतिकेचे दर्शन. वैवाहिक जीवन विस्कळीत असलेला एक दिग्दर्शक एका नव्या नयिकेला प्रकाशात आणतो, तिच्या प्रेमात पडतो. पुढे त्याची वाताहात होते. अखेर एक्स्ट्रॉ म्हणून काम करण्याची वेळ त्याच्यावर येते.
साल १९५७
प्यासा
निर्मिती -गुरूदत्त फिल्म्स
दिग्दर्शक -गुरूदत्त
संगीत -एस. डी. बर्मन
कलाकार – गुरूदत्त, माला सिन्हा, वहिदा रहमान, जॉनी वॉकर, रहमान, मेहमूद, कुमकूम, श्याम, लीला मिश्रा, माया दास, राध्येश्याम, अशिता मुझुमदार, तनवीर, मोहन सँडो.
कथानक सारांश – एका कवीची शोकांतिका. त्याची व्यवहारी प्रेयसी एका श्रीमंत प्रकाशकाशी लग्न करते. जग त्याच्या कवितांच मुल्यही ओळखत नाही. तो निराश होतो. जगाविषयी त्याच्या मनात चीड निर्माण होते. अशा स्थितीत एक वेश्या मात्र या कवीवर व त्याच्या कवितांवर प्रेम करते. एका अपघातात कवी मेला अशी जगाची समजुत होते. प्रत्यक्षात तो जिवंत असतो. त्याच्या निधनानंतर प्रकाशक त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊ इच्छितो तर वेश्येला फक्त त्याच्या कविता जगासमोर आणायच्या असतात. कवी जेव्हा स्वतःची ओळख सांगतो तेव्हा त्याच्यावर स्वार्थी जग विश्वास ठेवत नाही. त्याची साथ देते ती त्याच्यासारखीच जगाकडून तिरस्कृत, उपेक्षित झालेली वेश्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply